ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सकाळची न्याहारी किती आवश्यक.........

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2019 09:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सकाळची न्याहारी किती आवश्यक.........

शहर : मुंबई

सकाळचा न्याहारी शरीरासाठी किती आवश्यक आहे, हे सर्वजण जाणत असूनही अनेक लोक सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडतात. त्याचे दुष्परिणाम मग त्यांच्या शरीरावर होतात.

सकाळचा नाश्ता निरोगी राहण्यासाठी फार महत्वाचा आहे. नाश्ता शरीरात उर्जा निर्माण करतो. नाश्ता करणारे लोक नाश्ता करणार्या लोकांपेक्षा अधिक धडधाकट असतात. सकाळी उठल्यानंतर एक तासात नाश्ता करायला हवा. नाश्ता केल्याने मेंदूला चालना मिळते एकाग्रता वाढायलाही मदत होते. शाळा-कॉलेजांत जाणारी बरीचशी मूल जी नाश्ता करत नाही, त्यांच लक्ष्य अभ्यासात केंद्रित होत नाही. पण समतोल नाश्ता घेतला तर अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो.

सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिज, व्हिटॅमिन, फायबर, कार्बोहायड्रेट इत्यादी घटकांचा समावेश करा. नाश्त्यामध्ये भाज्या, फळं, दुध, मोड आलेले कडधान्य, पनीर, दही, सालीच्या डाळी इत्यादींचा समावेश करा. तसेच संमिश्र भाज्या मिळवलेले पोहे, ओट्स, उपमा, दालिया, चीलाल चपाती, इडली, उकडलेले अंडे इत्यादी घेऊ शकता.

सकाळचा नाश्ता केल्यास हृदयरोग, अल्सर, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो.

 

मागे

‘मोसंबी’चे फायदे
‘मोसंबी’चे फायदे

मोसंबी हे फळ मूळचे भारतीय नव्हे. मोझांबिक बेटाचे नावावरून याला मोसंबी हे ना....

अधिक वाचा

पुढे  

रक्ताविषयी……
रक्ताविषयी……

रक्ताविषयी तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी नक्की वाचा जगातील पहिली र....

Read more