ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाळंतपण आणि त्वचेचे आरोग्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2019 09:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बाळंतपण आणि त्वचेचे आरोग्य

शहर : मुंबई

गर्भवती महिलेचे आरोग्य हा काळजी घेण्याजोगा विषय असतो. या नाजूक अवस्थेत स्त्री आरोग्याप्रती सजग असतेच त्याचप्रमाणे सौंदर्याप्रतीही चिकित्सक असते.

गर्भारपणात स्त्रीच्या चेहर्यावर वेगळंच तेज दिसतं. ती उत्साही आणि आकर्षक दिसते. पण सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणात हे तेज हरवू शकतं. म्हणून गर्भारपणात सौंदर्य टिकवण्याचे काही उपाय योजायला हवेत. या काळात महिलांची त्वचा डी-हाइड्रेड होण्याचा धोका असतो. पोटावरील त्वचा ताणल्यामुळे सुरकुत्या पडण्याचा धोका असतो. म्हणूनच नियमितपणे मसाज करणं आवश्यक आहे. घराबाहेर पडताना सन प्रोटेक्शन क्रीमचा वापर करावा. डोकं झाकावं.

बाहेर पडताना पाण्याची बाटली बरोबर असावी. या दिवसात फ्रूट ज्यूस घेण्यापेक्षा पेरू, सफरचंद, संत्री-मोसंबी आदी फळांचं सेवन वाढवावं. यामुळे आरोग्य सुधारतंच त्याचप्रमाणे त्वचेची टवटवीही टिकून राहते.

आहारात हिरव्या भाज्या, बिन्स, प्रोटीनयुक्त पदार्थ आणि दह्याचा समावेश असावा. गर्भारपणात संप्रेरकांमध्ये बदल होत असल्याचा परिणाम त्वचेवर स्पष्ट दिसतो. यामुळे केसांवरही दुष्परिणाम जाणवतो. सुरुवातीच्या काही दिवसांतच केस गळण्याचा अथवा केसांचा पोत खालवण्याचा धोका असतो. म्हणूनच केसांचीही काळजी घ्यायला हवी.

 

मागे

बटाट्याचा रस पिण्याचे  फायदे
बटाट्याचा रस पिण्याचे फायदे

उकळलेले किंवा कच्चे बटाटे आपण अनेक चटपटीत पदार्थ बनविण्यात वापरले असतील पण....

अधिक वाचा

पुढे  

थर्माकोलच्या कपात चहा पिणे होऊ शकते नुकसानदायक
थर्माकोलच्या कपात चहा पिणे होऊ शकते नुकसानदायक

चहाच्या ठेल्यावर किंवा कॅफेत नेहमी लोकांना थर्माकोलच्या कपात चहा किंवा कॉ....

Read more