ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१ ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह:  विविध कार्यक्रमाचे आयोजन

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

१ ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह:  विविध कार्यक्रमाचे आयोजन

शहर : delhi

  ते ७ ऑगस्टच्या दरम्यान जागतिक स्तरावर स्तनपान सप्ताह आयोजित केला जात आहे. या  सप्ताहानिमित्त महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्तनदा माता आणि अंगणवाडी कार्यकर्त्यासाठी या आठवड्यात चर्चासत्र आयोजित आले आहे. तसेच देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. यामधे राज्यांचे आरोग्य विभाग, गृह विज्ञान महाविद्यालयं, वैद्यकीय संस्था, विद्यापीठं, स्वयंसेवी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत.

स्तनपानाचे महत्व

  • माता आणि बालक या दोघांच्याही आरोग्या निरोगी राहण्यासाठी
  • तान्ह्या बाळांना होणारा अतिसार आणि श्वसनविषयक संसर्गाची लागण रोखण्यासाठी
  • बालमृत्यूदर कमी करण्यासाठी
  • मातांमधे स्तन कर्करोग, अंडाशय कर्करोग, टाईप-२ मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यासाठी
  • बालकांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित विकार, मधुमेह यापासून संरक्षणासाठी

सप्ताहाची उद्दीष्ट

  • स्तनपानाविषयी पालकांमधे जागृती निर्माण करणे
  • मातांनी स्तनपान द्यावे आणि  त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे
  • स्तनपानाचे महत्व पटवून देणारे साहित्य पुरवणे .

बालक जन्मल्यापासून १ तासाच्या आत स्तनपान, पहिले सहा महिने फक्त स्तनपान, इतर कोणतेही दूध नाही, बालक दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान सुरुच ठेवणे महत्वाचे आहे. स्तनपानाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे यावर यावर्षी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

 

मागे

मलेरिया होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय
मलेरिया होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय

भारतामध्ये प्रत्येकवर्षी मलेरियामुळे दोन लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू ....

अधिक वाचा

पुढे  

हिंगाचे आयुर्वेदिक उपाय
हिंगाचे आयुर्वेदिक उपाय

स्वयंपाकघरातील सर्व प्रकारच्या नमकीन पदार्थांसाठी, रुचकर भाज्यांसाठी तसे....

Read more