ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 19, 2019 04:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !

शहर : मुंबई

एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरेम्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला !

मित्रांनो, भिकारी कोठे चुकला, ते ओळखा. तुम्हालाही सदोदित आनंदी रहायचे असेल, तर ‘समाधानी वृत्ती ठेवा.

मागे

दानशूर कर्ण
दानशूर कर्ण

बालमित्रांनो, कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध ह....

अधिक वाचा

पुढे  

यशाचे सूत्र : कधी-कधी अडचण लहान असते, पण आपणच त्याला मोठे संकट समजतो
यशाचे सूत्र : कधी-कधी अडचण लहान असते, पण आपणच त्याला मोठे संकट समजतो

एका लोककथेनुसार पुरातन काळा एका शेतकऱ्याच्या शेतात एक दगड फसलेला होता. त्य....

Read more