ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मरणा

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मरणा

शहर : मुंबई

मरणा,
भेट रे अध्ये मध्ये,
भेटतोस ते ही बर आहे बघ.....
तू भेटला नसतास तर ,
कुठे अन किती चिरंजीव प्रॉपर्ट्या,
घेऊन फिरले असते काय माहीत......

ते आताही फिरताहेत,आणि तू ही फिरतोहेस
फिरता फिरता कोणत्या वळणावर,
भेटशील ते सांग एकदा....
भेटीत जगण्याचा उरूस करता येईल ,
बघ साजरा...
तो साजरेपणा आयुष्यात  भरून होताच बघ...
इतकही भेसूर नसत बघ,आयुष्य....
फुलपाखराच्या रंगानी इंद्रधनू जगायचा ठरवला की 
जत्रा भरतेच बघ हमखास,
रंगीबेरंगी .....
तुझ्या जत्रेच ही तसच,
त्याच म्हागुंगीच्या जत्रेत मुंगी होऊन शिरेन...
लोकं कुजबुजतीलही...
त्यांची कुजबुज जीवन्त ठेवून जत्रेत शिरेन....
आणि हो सोबतीला तूच ये,
तूच सुशेंगाद आभाळ पहात पहाताचं 
यात्रा सुरू होईल बघ माझी.....
आणि हो त्यासाठी,
वजन ही ठेवलंय बघ बारीक,
खान्देकरी शिव्या देणार नाहीत इतपत.......
सोप्या मरणासाठी सोप्पच मरावं
कटकटीतून सुटताना ही हव्यात कशाला भानगडी..
सुटाव तर बेमालूमपणे......
खुशाल बसून घ्यावं गाडीत...
वाटेतली ठिकाण आठवतच
माणसे खांद्यावर घेतील ...
खांद्यावर  ही करावी गम्मत हमखास...
डोळे किलकिले करून ...
ढीगभर आलेल्या माणसांचं
खोट खोट का असेना पण रडणं पाहून
हसून घ्यावं पोटभर.....

थोडं पुढे लागेल तीच घर
माझ्यासाठी तिच्या संसाराची 
तिने केलेली राखरांगोळी माझ्या डोळ्यात भरता भरता
अफवा उठू लागतील
यात्रा पुढे न्या बाबांनो , एकदम पुढे न्या....

थोडं पुढे निघाल्यावर ,
म्हातारीचं घर लागेल  ,म्हातारीच रडु पाहून
आलेलं हसू पोटात दाबल्यावर आभाळ भरून येईल  बघ माझं...
पुन्हा माघारी परतण्यासाठी घरही शाबूत नसेल,
ते तसच ठेवून अंत्ययात्रा नदीवर येईल..

मरताना डोळे मिटेनचं,
स्वार्थकरी सगळे गोळा झालेले ,पहायला डोळे हवेतच कशाला उघडे........
हात मोकळे ठेवेनच ,
शेवटी सगळं संपत हे सांगायला.....
मनातलं सांगायची हौस भागवावी म्हणून
तोंड ही ठेवेन सताड उघड...

चरबी ही ठेवली आहे अंगात,
जळायला पटकन मदत व्हावी म्हणून
उगाच न जळल्याच्या अफवा गावभर पसरू नये म्हणून..
माती लोटणारी माणसे दिसू दे मला,
उगाच पाठी काही रहात हा मूर्खपणा
घेऊन जाईन सोबत...

जळण्याच्या घाईत ,
मी आणि माझ्या कवीता ही न कळलेला माझा नालायक मुलगा
मृत्युपत्रात नाव न टाकल्याबद्दल देत असलेल्या शिव्या, 
 ऐकतचं बधिर होईन....

मडकं बिडक फुटावे ही क्रियाच हो ....
आयुष्यभर फुटलेल्या ,
माझ्याच मी डोक्यावर टपली मारून
कोण कोण कुटून कुटून आलं बघतच ठरवेंन आता मरायचं....

रडणं सुरात  झालं की
 माणसं जळण्याची ची घाई करतील,
साला जिंदगी घाईतच होती म्हणा....

त्या घाईतचं कानावर आलेलं एकाद गाणं,
गुंणगुणतं ,
आता कोणतं रे माझं गाव,म्हणत म्हणतचं
नदी पुरेपूर कळल्याची खात्री पटवून घेईन....

खात्री पटता पटताच,
जोगीया पाठमोरा दिसेल...
स्वतःचा टाइम संपल्याची जाणीव पक्की झाल्यावर
पळवाटा शोधत राहण्यापेक्षा ,पायवाट धरावी तडक
जोगीया बेपत्ता झाल्याची खबर आलीच कानावर ,
ती घेऊनच,,,
जत्रेतल्या मांणसातन सुटाव,,
सुटका होताना,विचारू नयेच माणसांचे पत्ते,
पुन्हा घरे लागण्याचा धोका नकोच म्हणून 
आभाळ बघत बघत....  
घाई झालेल्या आयुष्यात ,
मरताना घाई नको म्हणून आभाळ थोडं पाहून घेता येईल,,,

तोवर नदी पोहचलेली असते दाराशी
चेहरेपट्टी झालेल्या माणसांच्या जत्रेतून,
आता घुमान निघावं...
गाडी स्टेशनला लागल्याची खात्री होईल...
एवढंच....

मागे

एक दार बंद झाले तर देव आपल्यासाठी दुसरे दार उघडतो, आपण खचून जाऊ नये
एक दार बंद झाले तर देव आपल्यासाठी दुसरे दार उघडतो, आपण खचून जाऊ नये

एका शेठजीला रात्री झोप येत नव्हती. शेठजी खूप श्रीमंत होते. संपुर्ण कुटुंब सु....

अधिक वाचा

पुढे  

व्यक्तीकडे कठोर परिश्रमासोबत धैर्य असायला हवे
व्यक्तीकडे कठोर परिश्रमासोबत धैर्य असायला हवे

बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी निगडीत अनेक प्रसंग आहे. ....

Read more