ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार रिंगणात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार रिंगणात

शहर : मुंबई

राज्यात पहिल्या टप्प्यातील सात लकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याच राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितल. निवडणूक तयारीची माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयिजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सात मतदारसंघातून एकूण ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात वर्धा १४, रामटेक १६, नागपूर ३०, भंडारा गोंदिया १४, गडचिरोली , चंद्रपूर १३ तर यवतमाळ मरदारसंघातील २४ उमेदवारांचा समावेश आहे. दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी आणि इतर साधनांची ने-आण करण्यासाठी यंदा तीन हेलिकाॅप्टरचा वापर करण्यात येणार असल्याचही दिलीप शिंदे यांनी सांगितले.

आचारसंहिता भंगाबाबत तक्रारीसाठी निवडणूक आयोगान सी व्हिजिल अॅप तयार केल आहे. या अॅपला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २५२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १४९३ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्या. त्यांची चौकशी होऊन कारवाई करण्यात आल्याचे दिलीप शिंदे यांनी यावेळी सांगितलं. सी व्हिजिल अॅपवरील तक्रारींवर १०० मिनिटांत कार्यवाही केली जाते, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यभर आतापर्यंत ९७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचही शिंदे यांनी यावेळी सांगितल. यात ३० कोटींची रोख रक्कम, १७ कोटींची दारू, .६१ कोटींचे ड्रग्ज् आणि ४४ कोटी रकमेच्या सोनेचांदीचा समावेश आहे.

मागे

कलम ३७० रद्द झाले तर संपूर्ण देश पेटेल- मेहबुबा मुफ्ती
कलम ३७० रद्द झाले तर संपूर्ण देश पेटेल- मेहबुबा मुफ्ती

केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यास संपूर्ण देश पेटेल, असे वक्....

अधिक वाचा

पुढे  

मनसे आता झाली “उनसे”, उमेदवार नसलेली सेना, मुख्यमंत्र्यांचा राजना टोला
मनसे आता झाली “उनसे”, उमेदवार नसलेली सेना, मुख्यमंत्र्यांचा राजना टोला

मनसे पहिल्यांदा  महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मतदार नसलेली सेना झ....

Read more