ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गौतमवर ‘गंभीर’ आरोप करताना ’आप’च्या उमेदवार रडू लागल्या!

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गौतमवर ‘गंभीर’ आरोप करताना ’आप’च्या उमेदवार रडू लागल्या!

शहर : delhi

सहाव्या टप्प्यातील प्रचार आज संपला.  लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व जागांवर (नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली आणि चांदणी चौक) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी यांनी गुरुवारी भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. अतिशी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी गौतम गंभीर यांनी काढलेले एक पत्रकच वाचून दाखवले. त्यामधील आक्षेपार्ह टिप्पणी वाचताना आतिशी या भावूक झाल्या आणि त्यांना रडू कोसळले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान आतिशी यांनी गौतम गंभीर यांना शिकाऊ असल्याचे संबोधले होते. गौतम गंभीर यांची प्रसिद्धी त्यांच्याविरोधातच जाईल. कारण, मोठ्या व्यक्तींना लोक फक्त पाहतात. मात्र, त्यांच्यासाठी जो वेळ देईल, त्यालाच प्रतिनिधी म्हणून निवडतात, असेही आतिशी म्हणाल्या होत्या. 

मागे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा

भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा एकदा सिंधू पाणी वाटप कराराच....

अधिक वाचा

पुढे  

घड्याळाचं बटण दाबलं तरीही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं-पवार
घड्याळाचं बटण दाबलं तरीही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं-पवार

हैद्राबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी माझ्यासमोर मशीन ठेवले होते. त्यात घड....

Read more