ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खातेवाटपाआधीच अब्दुल सत्तरांकडून राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

खातेवाटपाआधीच अब्दुल सत्तरांकडून राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

शहर : मुंबई

          मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज होते. त्यामुळे खाते मिळण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.


        अब्दुल सत्तार सध्या औरंगाबादेतील अतिथी हॉटेलमध्ये आहेत.  सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे ‘अर्जुन’ अर्थात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे प्रयत्नही निष्फळ ठरल्याचं चित्र आहे. सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे शिवसेनेने मान्य केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे ते नाराज होते. 


          दरम्यान, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा शिवसेनेकडे आलेला नाही. सत्तार ज्या नेत्यांकडे राजीनामा दिला असं सांगत आहेत त्यांच्याकडे राजीनामा आलेला नाही, असं सांगितलं जात आहे.


            विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. अल्पसंख्याक समुहातून येऊन सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून आपलं राजकीय वर्चस्व कायम राखलं.


 

मागे

CAA विरोधात एकजुटीने येण्यासाठी उद्धव ठाकरेंसह ११ राज्याना पिनराईंचे पत्र
CAA विरोधात एकजुटीने येण्यासाठी उद्धव ठाकरेंसह ११ राज्याना पिनराईंचे पत्र

        केरळ - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात केरळचे मुख्यमंत्....

अधिक वाचा

पुढे  

सत्तारांचा राजीनामा ही केवळ अफवा - अर्जुन खोतकर
सत्तारांचा राजीनामा ही केवळ अफवा - अर्जुन खोतकर

        अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही केवळ अफवा आहे. त्यांनी आपल्....

Read more