ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेकडून वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2019 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेकडून वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन

शहर : मुंबई

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मातोश्रीहून आदित्य ठाकरे रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष जनतेत जाऊन शिवसेनेकडून निवडणूक लढणारे आदित्य हे ठाकरे घराण्यातले पहिलेच ठाकरे ठरले आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या नातवाच्या विधानसभा निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

                                                             Maharashtra Vidhan Sabha 2019 yuva sena chief aditya thackeray takes blessings from balasaheb thackeray before filing nomination form | Vidhan Sabha 2019: ...अन् बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन आदित्य ठाकरे झाले नतमस्तक!

लोकसभा निवडणुकीच्या काळापासून गावपातळीपर्यंत जाऊन जनतेशी संवाद साधणाऱ्या आदित्य ठाकरेंकरता, वरळी विधानसभा निवडणुकीचा पेपर तसा फारच सोपा झाला आहे.वरळी विधानसभा मतदारसंघात या आधी राष्ट्रवादीकडून सचिन अहिर हे निव़डून येत होते, मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांना वाट मोकळी करून देण्यासाठीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे सचिन अहिर यासाठी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं दिसून येत आहे.

 

मागे

पाक दहशतवादी भारताला टार्गेट करतील अमेरिकेचा ‘नवा शोध’
पाक दहशतवादी भारताला टार्गेट करतील अमेरिकेचा ‘नवा शोध’

जम्मू काश्मीरला  विशेष दर्जा देणारे 370 कलम हटविल्यापासून पाकिस्तान चा थयथ....

अधिक वाचा

पुढे  

मनसे नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत
मनसे नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर एकीकडे जाग....

Read more