ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 01:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द

शहर : मुंबई

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे. शिवसेना भवनात उद्या दुपारी १२ वाजता  बैठक होणार आहे. या बैठकीमुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौराही पुढे ढकलण्यात आला आहे. उद्याच्या या बैठकीत भाजपसाेबत सत्तेत जाण्यासंदर्भात तसेच विधिमंडळ नेता निवडीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.त्याचवेळी आज शिवसेना नेत्यांची माताेश्रीवर खलबते सुरु झाली आहेत. काल भाजपसाेबतची बैठक रद्द केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा होत आहे. नेते संजय राऊत, अनिल देसाई, शिवाजीराव आढळराव, विजय औटी या बैठकीला उपस्थितीत आहेत. तर आणखी काही शिवसेना नेते माताेश्रीवर येत आहेत. त्यामुळे या बैठकीची माहिती मीडियाला मिळणार का, याचीही उत्सुकता आहे.

दरम्यान, भाजपने विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपकडून आज अधिकृत घोषणा केली. निवडणुकीच्यावेळी भाजपने पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असतील असे जाहीर केले होते. आजच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, युतीत तणाव निर्माण झाल्याने युतीचा मुख्यमंत्री कोण, याचीही चर्चा सुरु झाली आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करण्यात आले आहे. तर शिवसेनेने ५०-५० सत्तेत वाटा हवा असे सांगत युतीची बोलणी होण्याआधीच भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

 

मागे

राज्यातील  सत्ता स्थापनेचे चार पर्याय!
राज्यातील सत्ता स्थापनेचे चार पर्याय!

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन....

अधिक वाचा

पुढे  

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता
जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता

भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडला आपला विधिमंडळ नेता निवडला आहे. देवे....

Read more