ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 07:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

शहर : मुंबई

राज्याच्या राजकारणात रातोरात भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथघेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच  आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. यानंतर नुकतंच अजित पवार ट्विटरवर सक्रीय झाले आहेत. अजित पवार यांनी गेल्या 10 मिनिटात तब्बल 16 ट्विट केले आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद, “आपण राज्याला एक स्थिर सरकार देऊ. जे लोकहितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल. असे त्यांनी ट्विटवर म्हटंल आहे. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक भाजपच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले आहे.

अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यानंतर गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, राजनाथ सिंह, पियूष गोयल, जे.पी.नड्डा, यासारख्या अनेक नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी गेल्या 10 मिनिटात तब्बल 16 ट्विट करत भाजपच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

याशिवाय अजित पवार यांनी ट्विटरवरील स्वत:ची माहितीमध्येही बदल केला आहे. त्यांनी त्यांच्या नावाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्याशिवाय पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असेही लिहिले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.