ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसची मुसंडी; जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्रीपदी बसणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 04:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसची मुसंडी; जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्रीपदी बसणार

शहर : adilabad

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक मतदानाच्या निकालाचा आकडा स्पष्ट होताना दिसत आहे. वायएसआर काँग्रेसने आश्चर्यकारक आघाडी घेतली असून ते बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. वायएसआर काँग्रेसचे यश स्पष्ट होत असताना पार्टीचे आमदार 25 मे रोजी बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी जगनमोहन रेड्डी तिरुपती मंदिरात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलनुसार, राज्यातील 175 विधानसभा जागांपैकी 150 जागांवर वायएसआर काँग्रेस आघाडीवर आहे.

राज्यातील १७५ विधानसभा जागांसाठी हजार ११८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यापैकी सर्व जागांवर वायएसआर आघाडीवर असून नायडू पिछाडीवर आहेत. वायएयआर विधानसभा जागांवर आघाडीवर असून सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी पिछाडीवर आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांना आतापर्यंत विरोधी पक्षनेता म्हणून ओळखले जात होते. राजकीय नेत्याव्यतिरिक्त एक यशस्वी व्यावसायिक म्हणूनही जगनमोहन रेड्डी यांची ओळख आहे. राजकाराणात प्रवेश करण्यापूर्वी जगनमोहन रेड्डी यांनी 1999-2000 मध्ये व्यावसायिक म्हणून करियरची सुरुवात केली होती. कर्नाटकातील संदूर येथे त्यांनी एका पॉवर कंपनीची स्थापना केली. 2004 मध्ये वडील वाय.एस राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर जगनमोहन यांचा व्यवसाय वाढत जाऊन तो मीडियापर्यंतही पोहचला.

 

मागे

Election results 2019 : भाजपच्या विजयानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
Election results 2019 : भाजपच्या विजयानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्याम....

अधिक वाचा

पुढे  

Election Result 2019: मतमोजणी दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा मृत्यू
Election Result 2019: मतमोजणी दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज  ( २३ मे )  सकाळपासून सुरुवात झाली. मतमोज....

Read more