ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निकालानंतर ठाकरे गटाची बॅनरबाजी, पोस्टरवर पक्षप्रमुखाऐवजी हे पद…

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2024 05:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निकालानंतर ठाकरे गटाची बॅनरबाजी, पोस्टरवर पक्षप्रमुखाऐवजी हे पद…

शहर : dombivli

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला देखील आहे. त्याठिकाणी येऊन उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेसंदर्भात १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालात शिवसेनेची २०१८ मधील घटना अमान्य केली. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड अमान्य करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु झाली आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात या निकालास आव्हान देण्यात येणार आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या सासुरवाडीत लागलेल्या बॅनरवरुन चर्चा रंगली आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख पक्षप्रमुख ऐवजी कुटुंबप्रमुख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहे.

शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे यांचीच, असा निकाल दिला आहे. या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली सासुरवाडी डोंबिवली येथे येणार आहेत. उद्धव ठाकरे हे संपर्क दौऱ्यानिमित कल्याण लोकसभा मतदान क्षेत्रात शनिवारी येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शिवसेना ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर उद्धव यांचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे निकाल मान्य केल्याची चर्चा रंगली आहे.

लोकसभेच्या तयारीसाठी दौरा

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला देखील आहे. या लोकसभा मतदार संघासाठी एकीकडे भाजप प्रयत्न करत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाकडून हा लोकसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.

शिवसैनिकांना भाषणाची उत्सुक्ता

डोंबिवलीमधील शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुक्ता आहे. ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पहावे लागणार आहे. त्याच बरोबर ठाकरे यांची तोफ मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात धडाडणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

मागे

राहुल नार्वेकर आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल यांच्यात फरक काय?
राहुल नार्वेकर आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल यांच्यात फरक काय?

शिवसेनेच्या निकालावरुन सोशल मीडियात बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी न....

अधिक वाचा

पुढे  

ज्याला पक्षाची घटना माहीत नाही, तो काय पक्ष चालवणार?; शिंदे गटाच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर
ज्याला पक्षाची घटना माहीत नाही, तो काय पक्ष चालवणार?; शिंदे गटाच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्र....

Read more