ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

छगन भुजबळ यांना तुरुंगात जाण्याची भीती म्हणूनच… मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2024 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

छगन भुजबळ यांना तुरुंगात जाण्याची भीती म्हणूनच… मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?

शहर : जालना

अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात कायदा पारित करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे सातत्यानं करत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा..

मुंबईमध्ये जावून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळवल्यानंतरही मनोज जरांगे (Manoj Jarange) काही गोष्टींसाठी अद्यापही आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात कायदा पारित करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे सातत्यानं करत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ करत आहे. संभ्रम आणि विसंगत व्यक्तव्य करू नये असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

दुसरा समाज  असता तर मुंबईत धिंगाणा झाला असता- जरांगे

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला कायद्यात रूपांतर करण्यासाठी आणि काही आवश्यक सुचनांचे स्वागत केले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहेतसेच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे म्हणून 10 तारखेला आमरण उपोषणाला देखील ते बसणार असल्याचे जाहिर केले आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगे यांनी खडसावले. आव्हान देने हा त्यांचा धंदा आहे, मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी ते करतात. आमच्या अन्नात माती कालवली तर 27 टक्के आरक्षणाला आम्ही चॅलेंज करणार आहोत असंही जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना तुरूंगात जाण्याची भिती आहे म्हणून ते ओबीसी बांधवांची दिशाभुल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाचा लढा शांततेत सुरू आहे. मराठा शांततेत मुंबईत गेले आणि परत आले. या ऐवजी दुसरा समाज असता तर मुंबईत धिंगाणे झाले असते असेही जरांगे म्हणाले.

 

मागे

शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट! मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर
शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट! मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी ....

अधिक वाचा

पुढे  

महाविकास आघाडीत ‘स्वराज्य’ पक्ष विलीन करणार? संभाजीराजे यांची भूमिका समोर
महाविकास आघाडीत ‘स्वराज्य’ पक्ष विलीन करणार? संभाजीराजे यांची भूमिका समोर

महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर अस....

Read more