ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पवार कुटुंबातील त्या एका फोनमुळे अजित पवारांचे बंड मागे !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 04:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पवार कुटुंबातील त्या एका फोनमुळे अजित पवारांचे बंड मागे !

शहर : मुंबई

अजित पवार यांनी राजकीय करिअरमध्ये घेतल्या सर्वात धाडसी निर्णय आता मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप सोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी आपण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस हे स्पष्ट केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांचे मन वळवण्याचे वारंवार प्रयत्न केले गेले. पण अजित पवारांनी आज अखेर बंडखोरी माघे घेतली. गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादीकडून अजित पवारांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर अजित पवार यांनी माघार घेतली. अजित पवारांचे हे बंड अचानक कसे काय थंड झाले याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.

अजित पवार यांना मनवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाल्यानंतर अखेर पवार कुटुंबातील एका खास व्यक्तीने हस्तक्षेप केला.ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार होयत. अजित पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रतिभाताई आणि पवारांचे जावई सदानंद सुळे यांनी संपर्क केला. या दोन व्यक्तींनी केलेल्या फोनमुळेच अजित पवारांनी बंड मागे घेतल्याचे समजते.

अजित पवार प्रतिभाताईंचा फार आदर करतात. त्यामुळेच त्यांच्याशी बोलल्यानंतर अजित पवारांनी बंड मागे घेतले. प्रतिभाताईंनी अजितदादांवर आईप्रमाणे प्रमुख केले आहे. विशेष म्हणजे प्रतिभाताई राजकीय घडामोडीत कधीही पडत नाहीत. पवारांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात प्रतिभाताई कधीच दिसल्या नाहीत.पवार कुटुंबियांमधील या वादाच्या प्रसंगी प्रतिभाताई यांनी हस्तक्षेप केला. पवार कुटुंबात प्रतिभाताईंचे सर्वाधिक प्रेम अजितदादांवरच आहे. अजितदादा देखील त्यांचा शब्द कधीच खाली पडू देत नाहीत. अजित पवारांचे मन वळवण्यासाठी प्रतिभाताईंचा एक फोन कारणीभूत ठरल्याचे समजते.

 

मागे

महाराष्ट्रात भाजपचे 'चाणक्य' फेल
महाराष्ट्रात भाजपचे 'चाणक्य' फेल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनामा देण्याची न....

अधिक वाचा

पुढे  

एकनाथ खडसे असते तर महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं
एकनाथ खडसे असते तर महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना मंगळव....

Read more