ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राहुल गांधी आणि प्रियांका वडेरा यांच्यात मोठे मतभेद? काँग्रेस नेत्यांनी ठेवलं वर्मावर बोट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2024 07:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राहुल गांधी आणि प्रियांका वडेरा यांच्यात मोठे मतभेद? काँग्रेस नेत्यांनी ठेवलं वर्मावर बोट

शहर : देश

भाजपच्या आरोपामुळे देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस पक्षात सर्व काही आलबेल नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा यांच्यातील मतभेदावर आता कॉंग्रेस नेत्यानेच मोठे भाष्य केले आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. राहुल गांधी यांचे मोठे समर्थक मिलिंद देवरा यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामागोमाग आता आणखी एक नवी माहिती समोर येत आहे. राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका गांधी वडेरा यांच्यात काही कारणावरून मतभेद आहेत का? यावर एका वरिष्ठ कॉंग्रेस नेत्याने मोठी माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपनेही असाच आरोप केला होता. त्यामुळे ही भाजपचीच खेळी असावी का? अशीही शंका उपस्थित करण्यात येत आहे.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यात सर्व काही ठीक चालत नसल्याचे म्हटले होते. या दोघांमधील वाद उघडपणे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अत्यंत प्रभावशाली लोक मणिपूरमध्ये पोहोचले. मात्र, प्रियांका त्यावेळी बेपत्ता होत्या. त्याआधी त्यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आले होते. ते ही त्या पक्षाच्या सरचिटणीस असताना असा आरोप भाजपने केला होता.

भाजपने केलेल्या या आरोपावर कॉंग्रेसने खुलासा करत भाजपवर टीका केली होती. मात्र, भाजपच्या या आरोपामुळे देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस पक्षात सर्व काही आलबेल नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा यांच्यातील मतभेदावर आता कॉंग्रेस नेत्यानेच मोठे भाष्य केले आहे.

काँग्रेस नेते आणि दोनदा लोकसभा निवडणूक लढवलेले प्रमोद कृष्णम यांनी यावर भाष्य करताना असे म्हटले आहे की, काँग्रेसला खास लोकांनी घेरले आहे. जे प्रियंका गांधी यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्याचे काम करत आहेत. तर, राहुल गांधी यांना भारत यात्रेच्या निमित्ताने प्रवास चालू ठेवण्याचा सल्ला काहींनी दिला आहे असे ते म्हणाले.

गांधी घराणे हे रामाच्या विरोधात नाही. त्यामुळे राम मंदिराला त्यांचा विरोध नसेल. पण, त्यामागे भाजप जे राजकारण करत आहे त्याला कॉंग्रेसचा विरोध आहे असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला भगवान प्रभू राम यांचा आशीर्वाद आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान, संभलमधील कल्की पीठाधीश्वर आचार्य कृष्णम यांनीही, इंडिया आघाडीचा भाग असलेले मित्र पक्ष हे भाजपला कमी आणि गांधी कुटुंबाला जास्त लक्ष्य करत आहेत असे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये जो श्री राम आणि सत्याबद्दल बोलतो, वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न करतो त्याला काँग्रेस सोडावी लागते असेही त्यांनी सांगितले.

मागे

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा केंद्र सरकारची जबाबदारी – संजय राऊत
ठाकरे कुटुंबाची सुरक्षा केंद्र सरकारची जबाबदारी – संजय राऊत

"वरळी डोम येथे उद्धव ठाकरे यांची काही कायदेपंडितांसोबत महापत्रकार परिषद ....

अधिक वाचा

पुढे  

विधानसभा अध्यक्षांनी एका झटक्यात ठाकरे गटाचे आरोप फेटाळले; ‘त्या’ पत्राचाही एका वाक्यात निकाल
विधानसभा अध्यक्षांनी एका झटक्यात ठाकरे गटाचे आरोप फेटाळले; ‘त्या’ पत्राचाही एका वाक्यात निकाल

राष्ट्रवादीच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्....

Read more