ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपला सत्तास्थापनेची अजूनही संधी...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 07:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपला सत्तास्थापनेची अजूनही संधी...

शहर : मुंबई

एकीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीने पाठिंब्याचं पत्र आलंच नसल्याने सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेची कोंडी झाली. तर दुसरीकडे आम्ही सत्तास्थापना करू शकत नाही म्हणणाऱ्या भाजपच्या गोटात मात्र वेगळीच खलबतं सुरू असल्याची बातमी आहे. भाजपच्या वरीष्ठ सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, शिवसेनेचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. शिवसेनेच्या खासदारांना फोडून सरकार बनवणार, अशी शक्यता त्यामुळे नाकारता येत नाही.

भाजपचे नेते आता शिवसेनेबरोबर सत्तास्थापना करण्यास उत्सुक नाहीत. राष्ट्रवादीची मदत घेण्याबाबतही पक्षात मतभेद आहेत. राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा निवडणुका टाळायचं असेल तर स्थिर सरकार देणं याला सगळ्याच राजकीय पक्षांनी आपलं प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे. पण त्यासाठी कोण आणि कशी तडजोड करणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, "आमच्याकडे फक्त 54 आमदार आहेत. काँग्रेस आघाडीचे एतत्रितसुद्धा 98 आमदार होतात. पुरेसं संख्याबळ आमच्याकडे आत्ता तरी नाही."

आम्हाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करतील असं वाटलं नव्हतं. आता काँग्रेसशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची उद्या एकत्रित बैठक होणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होऊ शकेल. रात्री साडेआठपर्यंतची मुदत राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे.

भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर आता शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी आहे असं वाटत असतानाच चक्र फिरली आणि राज्याच्या राजकाराणाला अर्ध्या तासात ट्विस्ट मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयावर आता महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. शिवसेनेबरोबर जाण्यास सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका वाड्रा अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यामुळेच पाठिंब्याचं पत्र वेळेत मिळालं नाही. राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसनेही कळवलं.

मागे

पाठिंब्याचे पत्र न दिल्याने उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज
पाठिंब्याचे पत्र न दिल्याने उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज

मोठ्या दिमाखात राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या शि....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर काँग्रेसला माजी पंतप्रधानांनी दिला सल्ला...
शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर काँग्रेसला माजी पंतप्रधानांनी दिला सल्ला...

महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर काँग्रेसचा विचार सुरु ....

Read more