ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच, BJP उमेदवाराच खळबळजनक विधान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2019 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच, BJP उमेदवाराच खळबळजनक विधान

शहर : मुंबई

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी काही तास उरलेले असताना भाजप उमेदवाराचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरियाणातील असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बक्षीस सिंग विर्क यांनी ईव्हीएम संदर्भात केलेलं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामुळे ऐन मतदानापूर्वीच भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत बक्षीस सिंह विर्क?

'तुम्ही कोणतंही बटण दाबलं तरीही मत कमळाच्याच निशाणीला जाणार आहे', असा धमकीवजा इशारा विर्क यांनी मतदारांना दिला आहे. यामुळे विर्क यांच्यावर चौफेर टीका होत आहे. एका सभेदरम्यान त्यांनी हे खळबजनक विधान केल्याची माहिती समोर आली आहे. मतदारांना भाजपला मत देण्याचं आवाहन करताना विर्क यांनी थेट त्यांना धमकीवजा इशारच दिला आहे. 'ईव्हीएममधलं कोणतंही बटण दाबा, मत कमळालाच जाणार', असा खळबळजनक दावा विर्क यांनी केला आहे.

पुढे त्यांनी असंही म्हटलं की,' जर तुम्ही आज चूक केली, तर याची शिक्षा तुम्हाला पुढील 5 वर्षे भोगावी लागेल. कोणी कोणाला मतदान केलं याची आम्हाला माहिती मिळेलच. पंतप्रधान मोदी आणि मनोहरलाल यांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे. तुम्ही मत कोणालाही द्या, जाणार तर कमळालाच. कारण आम्ही मशीन सेट केलं आहे', असा खळबळजनक दावा विर्क यांनी भरसभेत केला.

विर्क यांनी मतदारांना स्पष्टपणे सांगितलं की, ईव्हीएममध्ये अशी सेटिंग केली ज्यामुळे थेट मत भाजपच्याच पारड्यात पडणार आहे. विर्क यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, विर्क यांनी विधानासोबत  छेडछाड करण्यात आल्याचं सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

 

मागे

धनंजय मुंडेंच्या तक्रारीनंतर भाजपच्या सोशल मीडिया टीमवर गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंच्या तक्रारीनंतर भाजपच्या सोशल मीडिया टीमवर गुन्हा दाखल

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असत....

अधिक वाचा

पुढे  

रिमझिम पावसात विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान
रिमझिम पावसात विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २....

Read more