ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

साक्षी महाराजांनी मोडली रांग; मतदार संतप्त

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

साक्षी महाराजांनी मोडली रांग; मतदार संतप्त

शहर : मुंबई

सर्वत्र लोकसभा निवडणूकीचे मतदान सुरू आहे. भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी रांग मोडून मतदान केल्याबद्दल सर्वसामान्य मतदारांनी संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशातल्या उन्नवचे खासदार असलेल्या साक्षी महाराज यांनी मतदान केंद्राबाहेर रांग असतानाही थेट प्रवेश केला. त्यामुळे रांगेत शिस्तीनं उभ्या असलेल्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली. 
सकाळी आठच्या सुमारास भाजपाचे खासदार साक्षी महाराज मतदान केंद्रावर पोहोचले. साक्षी महाराज यांना भाजपानं पुन्हा एकदा उन्नवमधून उमेदवारी दिली आहे. साक्षी महाराज मतदान केंद्रावर पोहोचले, त्यावेळी मतदान केंद्राबाहेर रांग होती. मात्र साक्षी महाराज रांगेत उभे न राहता थेट मतदान केंद्रात शिरले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मतदान करुन निघून गेले. साक्षी महाराजांच्या या मुजोर वृत्तीबद्दल रांगेत उभ्या असलेल्या अनेकांनी संताप व्यक्त केला. 
साक्षी महाराजांनी रांगेत उभं न राहता थेट मतदान केल्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं रांगेत उभ्या असलेल्या काहीजणांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांगेत उभे राहतात. तर मग साक्षी महाराज का उभे राहू शकत नाहीत, असा सवाल एका मतदारानं उपस्थित केला. तर दुसर्‍या मतदारानं रांगेत उभे राहणारे वेडे आहेत का, असा प्रश्न विचारला.

मागे

तळीरामांचे मतदानामुळे झाले ‘वांदे’
तळीरामांचे मतदानामुळे झाले ‘वांदे’

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूची बेकायदेशीर विक्री आणि निर्मित....

अधिक वाचा

पुढे  

मुलुंड पूर्वेकडील मतदान केंद्र बाहेर गोंधळ; भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 
मुलुंड पूर्वेकडील मतदान केंद्र बाहेर गोंधळ; भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मुलुंड पूर्वेकडील भागात असलेल्या होली एन्जल स्....

Read more