ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना सोबत आली तर नाहीतर शिवसेनेशिवाय …,भाजपाच्या मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 01, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना सोबत आली तर नाहीतर शिवसेनेशिवाय …,भाजपाच्या मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला

शहर : मुंबई

विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेचं गणित कोण जुळवून आणणार या प्रश्नावर भाजपानं आपल्या बाजुनंच उत्तर काढलंय. येत्या ५ नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. शिवसेना पुढे आली तर सोबत नाहीतर शिवसेनेशिवाय भाजपा एकट्यानंच शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात.

आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे मंत्रीमंडळ तयारीची जबाबदारी देण्यात आलीय. २०१४ प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची तयारी भाजपानं केलेली दिसतेय. २०१४ साली मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या प्रमुख १० मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. शिवसेना त्यानंतर दीड महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती. यावेळी शिवसेना आता बरोबर आली तर ठीक अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याचं समजतंय.

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. यावेळचा शपथविधी समारंभही भव्य दिव्य करण्याची तयारीही करण्यात येतेय.

पक्षीय बलाबल

भाजपा १०५

शिवसेना ५६

राष्ट्रवादी ५४

काँग्रेस ४४

बहुजन विकास आघाडी ३

एमआयएम २

समाजवादी पार्टी २

प्रहार जनशक्ती पार्टी २

माकप १

जनसुराज्य शक्ती १

क्रांतिकारी शेतकरी पार्टी १

मागे

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमित शहा यांची मुंबई भेट रद्द?
शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमित शहा यांची मुंबई भेट रद्द?

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तावाटपवारून सुरु असलेली धुसफुस संपुष्टात आण....

अधिक वाचा

पुढे  

तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला इशारा
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला इशारा

वेळ पडल्यास आम्ही आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करू सरकार स्थापन करू, असा इशार....

Read more