ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कर्नाटक सत्ता संघर्ष : कॉंग्रेस नेते शिवकुमार यांना हॉटेल बूकिंग असताना मुंबईत पोलिसांनी रोखले

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 02:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कर्नाटक सत्ता संघर्ष : कॉंग्रेस नेते शिवकुमार यांना हॉटेल बूकिंग असताना मुंबईत पोलिसांनी रोखले

शहर : मुंबई

कर्नाटकातील कॉंग्रेस जेडीस च्या सरकारवर संकट ओढले असताना सरकारच्या मदतीसाठी धावून आलेले कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी थेट मुंबई गाठली मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना गेटवरून माघारी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान डी.के. शिवकुमार यांनी आपणही या हॉटेलचे बूकिंग केले आहे, त्याबाबतचे तसे पत्र ही दाखवले मात्र पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. तर दुसरीकडे होटेलबाहेर काहींनी शिवकुमार ' गो बॅक' असे नारे लगावले.

कर्नाटक मधील कॉंग्रेस -जेडीस च्या 13 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार या 13 आमदारांपैकी 8 आमदारांनी चुकीच्या पद्धतीने राजीनामे दिलेले नाहीत. त्यामुळे ते स्वखुशीने दिले आहेत किंवा त्यांच्यावर दबाव होता ही बाब स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे ते नामंजूर करीत आहे. उर्वरित 5 आमदारांनी  योग्य पद्धतीने राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी भेटून प्रक्रिया पूर्ण करावी असे म्हटले आहे.

दरम्यान राजीनामे दिलेले कॉंग्रेस जेडीसचे आमदार मुंबईत पवईतील रेनेसन्स या हॉटेल मध्ये आहेत. या बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी कॉंग्रेस नेते शिवकुमार मुंबईत आले आहेत. त्यांना हॉटेल बाहेरच  थांबवा , त्यांना येऊ देऊ नका, कर्नाटक सरकार आम्हाला पळवून नेण्याच्या प्रयत्नात आहे, आम्हाला सुरक्षा पूरवा  अशी मागणी या आमदारांनी केली होती. त्यानुसार होटेल बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. म्हणून तेथे गेलेल्या शिवकुमार यांना पोलिसांनी प्रवेश नाकारल्याचे कळते.

मागे

उर्मिला मातोंडकरला शिवसेनेची ऑफर ?
उर्मिला मातोंडकरला शिवसेनेची ऑफर ?

कॉंग्रेसवर नाराज असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला शिवसेने....

अधिक वाचा

पुढे  

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात  शिवसेनेची 'जन आशीर्वाद यात्रा '
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात  शिवसेनेची 'जन आशीर्वाद यात्रा '

आगामी विधानसभा निवडनुकीची शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आल....

Read more