ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देवेंद्र फडणवीस यांचाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 03:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देवेंद्र फडणवीस यांचाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

शहर : मुंबई

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3.30 मिनिटांनी पत्रकार परिषद घेत आहेत, त्यात ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.तर दुसरीकडे दिल्लीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच जेपी नड्डा यांची देखील बैठक पार पडतेय. विशेष म्हणजे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीत काय निर्णय होईल महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींविषयी ही बैठक आहे का, हे लवकरच दिसून येणार आहे. अजित पवार यांनी आपला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा माध्यमांवर सुरू आहे.

राज्यपालांकडे काही दिवसांपूर्वी संख्याबळाचा दावा करत, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे एकूण 162 पेक्षा जास्त आमदार कायम असल्याने, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं जात आहे.

मागे

महाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?
महाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?

राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शनिवारी उपमुख्यमंत्र....

Read more