ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटाने आणले अडचणीत? हायकोर्टाने पाठवली नोटीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2024 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटाने आणले अडचणीत? हायकोर्टाने पाठवली नोटीस

शहर : मुंबई

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) 16 आमदार प्रकरणी सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला. त्याचसोबत त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र असल्याचा निर्णय दिला. मात्र, याच निर्णयावरून शिंदे गटाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अडचणीत आणले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) काळ जनता न्यायालय या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केल होते. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवून शिवसेनेने राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर, इकडे शिंदे गटानेही राहुल नावेर्कर यांचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) 16 आमदार प्रकरणी सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला. त्याचसोबत त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र असल्याचा निर्णय दिला. मात्र, याच निर्णयावरून शिंदे गटाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अडचणीत आणले आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च नायालयात याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदारांना अपात्र ठरवू नये या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना नोटीस बजावली आहे.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला नोटीस बजावली आहे. तसेच, सर्व प्रतिवादींना याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयात दिले आहेत. खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 8 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली.

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुख्य व्हीप भरत गोगावले यांनी प्रतिस्पर्धी गटातील 14 आमदारांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांमध्ये अपात्रतेच्या याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या 10 जानेवारीच्या आदेश हावैधता, योग्यता आणि अचूकताया निकषांन आव्हान देत आहेत असे म्हटले आहे.

भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयाला विधानसभा अध्यक्ष यांचा आदेश कायद्याने रद्दबातल ठरवावा, तो रद्द करावा आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (यूबीटी) सर्व 14 आमदारांना अपात्र ठरवावे, अशी विनंती केली आहे. न्यायालयाने यावरसर्व प्रतिवादींना नोटीस बजावू द्या. जर काउंटर ऍफिडेविट असेल तर ते अगोदरच दाखल केले पाहिजे. त्याच्या प्रती याचिकाकर्त्याला दिल्या पाहिजेत. या प्रकरणी 8 फेब्रुवारीला सुनावणी होईल असे म्हटले.

मागे

अजित पवार गटाकडून शरद पवार यांना पुन्हा धक्का, दौऱ्याआधी चौघांनी सोडली साथ
अजित पवार गटाकडून शरद पवार यांना पुन्हा धक्का, दौऱ्याआधी चौघांनी सोडली साथ

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्हापातळीवरील महत्वाचे ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई हायकोर्टाची 14 आमदारांना नोटीस, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
मुंबई हायकोर्टाची 14 आमदारांना नोटीस, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणा....

Read more