ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘मत कोणाला देत आहोत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे बघितल्याशिवाय मत देऊ नका’- उद्धव ठाकरे

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘मत कोणाला देत आहोत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे बघितल्याशिवाय मत देऊ नका’- उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

व्यासपीठावरून शाब्दीक फटकारे लगावत फोटो, व्हीडिओ, पुराव्या यांच्यासहित भाषण करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भाषणाची शैली सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. डिजीटल भाषणाची ही शैली आता चक्क शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली असल्याचे दिसून आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या प्रचार सभेत राज यांच्या भाषण शैलीची नक्कल करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची व्हीडिओ क्लीप स्क्रिनवर दाखवत त्यांच्यावर टीका केली. शिवसेनेचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्सवर जाहीर सभा घेण्यात आली होती, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पुराव्यासह भाषण करण्याच्या शैलीप्रमाणे डिजीटल स्क्रीनवर व्हीडिओ दाखवल्याने ‘उद्धव यांनी राज यांची कॉपी' केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगली गाजत आहे.
‘मत कोणाला देत आहोत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे बघितल्याशिवाय मत देऊ नका’ असे म्हणत उद्धव यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ‘या नालायक कारट्याच्या हातात देश देणार? अशांना तुम्ही पंतप्रधान म्हणून निवडून देणार आहात का?’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंनी मोदींच्या व्हीडिओ क्लिप दाखवत, या अशा व्यक्तीला तुम्ही पुन्हा पंतप्रधान करणार आहात का ? असा सवाल केला होता. राज यांनी गुढीपाडवा मेळाव्याला तसेच आधीच्या सभांना व्हीडिओ क्लिप दाखवत नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

मागे

८.५८ लाख कन्हैया कुमारने भाषणातून कमावले
८.५८ लाख कन्हैया कुमारने भाषणातून कमावले

विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून भारतीय क....

अधिक वाचा

पुढे  

बायोपिकपाठोपाठ ‘नमो टीव्ही’वरही बंदी
बायोपिकपाठोपाठ ‘नमो टीव्ही’वरही बंदी

निवडणुकीच्या मतदानाआधीच भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जोरदार धक्के बसत ....

Read more