ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोण आहे गद्दार ? एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आरसाच दाखवला, पोस्ट प्रचंड व्हायरल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2024 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोण आहे गद्दार ? एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आरसाच दाखवला, पोस्ट प्रचंड व्हायरल

शहर : मुंबई

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंदर्भात निकाल दिला. शिवसेना आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगानंतर हा तिसरा निर्णय शिवसेनेसंदर्भात आला.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर राज्याची सूत्रे त्यांच्याकडे आली. यावेळी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची? यासंदर्भात लढाई सुरु होती. बुधवारी दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंदर्भात निकाल दिला. शिवसेना आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. या निकालात दोन्ही गटातील कोणत्याही आमदारास अपात्र ठरवण्यात आले नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात गद्दार कोण? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला आहे.

       

काय आहे पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत एक्स अकाउंटरुन ट्विट करण्यात आले आहे. त्यात चार ओळी दिल्या आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आधी वाचवली शिवसेना, मग सोडवला धनुष्य. आज सिद्ध झाला निर्णय, कोण आहे गद्दार मनुष्य. !! विजय शिवसेनेचा.. विजय हिंदुत्वाचा !!”. त्याचवेळी सोबत आरसा असणारे कार्टून काढले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आरसा दाखवत असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या पोस्टवर युजरने अनेक कॉमेंट केल्या आहेत.

           

हे ट्विट झाले होते व्हायरल

सन २०१९ मधील एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. ते ट्विट विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचे आहे. ‘शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शवला. मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार.’, असे त्यात म्हटले आहे. यावेळी युजरने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. २०१८ ची घटना अमान्य मग २०१९ ची उमेदवारी कशी मान्य ? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी गद्दर कोण ? असे ट्विट व्हायरल झाले आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे गट पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यासंदर्भात ठाकरे गटाच्या वकिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे.

 

मागे

इंडिया आघाडीत बिघाडी? काँग्रेसला वगळून पडद्यामागे मोठ्या हालचाली
इंडिया आघाडीत बिघाडी? काँग्रेसला वगळून पडद्यामागे मोठ्या हालचाली

इंडिया आघाडीची एकीकडे रणनीती आखली जात असल्याच्या बातम्या समोर येत असताना, ....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल, मोदींच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज
पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल, मोदींच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज

पंतप्रधान मोदी आधी काळाराम मंदिरात दर्शन घेणार त्यानंतर ते गोदावरीची महाआ....

Read more