ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सिंहांकडून 640 जणांना चहा, तर साध्वींकडून 581 जणांना टोप्या!

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 02:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सिंहांकडून 640 जणांना चहा, तर साध्वींकडून 581 जणांना टोप्या!

शहर : bhopal

लोकसभा निवडणूक कालावधीत आयोगाला तीन वेळा प्रचारासाठी खर्च केलेल्या खर्चाचा तपशील देणे बंधणकारक असते. त्यानुसार खर्चाच्या दुसर्‍या टप्यातील माहिती देताना दिग्विजय सिंह आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे पर्यंत दिग्विजय सिंह यांनी 21. 30 लाख रूपये खर्च केले आहेत तर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी 6 मे पर्यंत 11.43 लाख रुपये खर्च केले आहेत. 

दिग्विजय यांना पक्षाकडून 40 लाख रुपये 

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पूर्ण प्रचारासाठी दिग्विजय सिंह यांना काँग्रेसकडून 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या टप्यात 18 एप्रिल रोजी दहा लाख आणि 22 एप्रिल रोजी 40 लाख रुपये देण्यात आले. 

प्रज्ञा यांनी भिक्षेतून मिळविले 4.4 लाख रुपये  

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रचारादरम्यान जनतेकडून भिक्षेच्या स्वरुपात 4.4 लाख रुपये मिळाले आहेत. त्यांना पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा निधी मिळाला नाही.  दोन्ही उमेदवारांनी रहाण्यासाठी आणि गाड्यांसाठी हा खर्च केला आहे. निवडणूक आयोगाने केलेलया चौकशीत हेही समोर आले आहे की, प्रचार सुरु झाल्यापासून 2 मे पर्यंत दिग्विजय सिंह यांनी 3 हजार 840 रुपये 640 कप चहासाठी खर्च केले आहेत. तर प्रज्ञा सिंह यांनी 1 हजार 219 रुपयांच्या 581 टोप्या वाटल्या आहेत. त्यांनी 3 हजार 200 रूपये ढोल आणि दीड हजार रुपये 300 कप चहासाठी खर्च केले आहेत. प्रज्ञा सिंह यांनी 3 हजार 240 रुपयांची फुले घेतली तर 8 हजार 165 रुपये खुर्च्यांसाठी खर्च केले. 

मागे

मध्यप्रदेशमध्ये स्मृती इराणीच्या सभेला अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली
मध्यप्रदेशमध्ये स्मृती इराणीच्या सभेला अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या दोन टप्यात मतदान होण्याचे बाकी असताना, सर्वच ....

अधिक वाचा

पुढे  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा

भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा एकदा सिंधू पाणी वाटप कराराच....

Read more