ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा

शहर : विदेश

          लाहोर - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लादली होती. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि या खटल्यात विशेष न्यायालयानं आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नसून त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. 


           २०१३ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता. त्यानंतर ३१ मार्च २०१४ मध्ये मुशर्रफ यांना आरोपी घोषित करण्यात आलं आणि त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात साक्षी नोंदवल्या गेल्या. मुशर्रफ यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल १७ डिसेंबरला दिला जाईल, असं तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं या आधी सांगितलं होतं. त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयानं २८ नोव्हेंबरला मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकारकडून दाखल याचिकांवरील सुनावणीवेळी विशेष न्यायालयाला निकाल सुनावण्यापासून रोखले होते.

           दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिलं होतं. 'मी खूपच आजारी असून, देशात येऊन जबाब नोंदवणं शक्य नाही,' असं ते म्हणाले होते. यासंबंधी पाकिस्तानी माध्यमांनीही वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मुशर्रफ यांना दुर्मिळ आजार असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं या वृत्तात म्हटलं होतं. मुशर्रफ यांनी देशद्रोहाचे आरोप फेटाळले होते. मी नेहमीच या देशाची सेवा केली आहे. देशाशी गद्दारी केल्याचा आरोप साफ चुकीचा आहे. दहा वर्षे मी देशाची सेवा केली. त्यामुळं माझ्यावर देशद्रोहाचा कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले होते.

मागे

जामिया हिंसाचार प्रकरणी १० जणांना अटक
जामिया हिंसाचार प्रकरणी १० जणांना अटक

        नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत जामियानगर परिसरात ....

अधिक वाचा

पुढे  

मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 23 किंवा 24 तारखेला
मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 23 किंवा 24 तारखेला

           मुंबई -  महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंब....

Read more