ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सत्ता येत जात राहते नाती कायम राहतात - सुप्रिया सुळे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सत्ता येत जात राहते नाती कायम राहतात - सुप्रिया सुळे

शहर : मुंबई

महाराष्ट्राने एक वेगळे चित्र पाहिले. विधिमंडळात नवीन आमदारांच्या शपथविधीआधी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेतली. त्याधी सुप्रिया सुळे या प्रत्येक नव्या आमदारांचे स्वागत करत होत्या. त्यावेळी सोबत दिलीप वळसे-पाटील होते. महिनाभरात नीटशी झोप नाही पण तरी आज सगळा ताण दूर पळाला होता. जणू घरचा एखादा लग्न सोहळा असावा अशा सुप्रियाताई सगळ्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या, आल्यागेल्याचं स्वागत, कौतुक सुरू होते. त्यात मग विरोधकांचंही त्यांना वावडे नाही हेही दिसले. जे बाबांनी शिकवलं तेच दिसले. आशीष शेलार आले देवेंद्र फडणवीस आले प्रत्येकाचं हसतमुख चेहऱ्यानं स्वागत केले.

शपथविधीची वेळ जवळ यायला लागली तशी गर्दी वाढायला लागली. हॉटेलमध्ये असलेले सगळ्याच पक्षांचे आमदार आले. इथे अनेक नातीही दिसली. चार दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अजित दादांसोबत दिसले तेव्हा दुखी झालेल्या सुप्रियांनी आज धनंजय मुंडेनाही मिठी मारली. ही दृश्य खूप काही सांगून गेली. अजित पवारांची मनधरणी करणारे जयंत पाटील, देवेंद्र पडणवीस दिसताच खुलले, त्यांच्या स्वागतासाठी गेले. दोघांनी प्रसारमाध्यमांना छान पोझ दिली आणि पुढे गेले.

सत्ता येत जात राहते नाती कायम राहतात हे सुप्रिया सुळेंचे वाक्य खूप काही सांगून गेले. भावा बहिणीचं नातं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं पण या भावाबहिणीचं नातं विशेष कारण या नात्यातल्या प्रत्येक हालचालीवर कोट्यवधी नजरा खिळल्यायत. रुसवे फुगवे दूर झाले, संणांना एकत्र येणं होईल पण अजित दादा परत जाईल का ही भीती मात्र कायम राहील.महाविकासआघाडी भविष्यात उत्तम काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. महाविकासआघाडीचं श्रेय तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जातं असंही ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे, पवारांचे नातू रोहित पवार आणि खासदार सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे यांनी आज आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. या तिन्ही नेत्यांनी आज आमदारपदाची शपथ घेतली.मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार असं अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं उत्तर दिलं. अजित पवारांनी मंगळवारी रात्री सिल्व्हर ओक इथं जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यासंबंधी विचारण्यात आलं असता, शरद पवार आपले नेते आहेत म्हणूनच भेटायला गेला होतो असं त्यांनी सांगितलं.

 

मागे

अजितदादांचा दरारा कायम! माध्यमांच्या या प्रश्नावर भडकले
अजितदादांचा दरारा कायम! माध्यमांच्या या प्रश्नावर भडकले

राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अजि....

अधिक वाचा

पुढे  

विधानसभेत 288 आमदारांचा शपथविधी सोहळा
विधानसभेत 288 आमदारांचा शपथविधी सोहळा

बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द....

Read more