ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2024 11:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ

शहर : अहमदनगर

ओबीसी नेते देखील घाबरतात. मात्र आमच्या सोबत 70 टक्के समाज आहे. बजेटमधून आम्हाला आरक्षण मिळाल तर द्या, असं त्याने सांगितलं. त्याचं हे विधान ऐकून मला वाईट वाटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व सांगितले. मात्र त्यांनी आरक्षण दिलं नाही. मला मराठा नेत्यांची कीव वाटते, हा कसला तुमचा नेता? हा म्हणतोय मंडल आयोग संपून टाकू. मग आरक्षण कशाला मागतो? असा संताप त्यांनी व्यक्त केला.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाना साधला आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली. तुमची शपथ पूर्ण झालीय. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोट करून भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली आहे.

नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनाच थेट सवाल केला. मला म्हणता भुजबळ राजीनामा द्या म्हणतात. एक आमदार बडबडला भुजबळांना लाथ मारून मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. मला सर्वांना सांगायचं आहे मी राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो. मी राजीनामा दिला आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. 17 तारखेला पहिली ओबीसी सभा होती. त्याआधीच राजीनामा दिला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मग उपोषण कशाला करता?

यावेळी त्यांनी अध्यादेशावरून मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवली. तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला. मग आता उपोषण कशाला करत आहात? अध्यादेश आणि मसुदा यातील फरक याला कळत नाही. मराठा समाज्याला आरक्षण मिळाला पाहिजे. आमचा विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका, असं सांगतानाच सर्व्हेक्षण करायला अर्धा तास जातो. अनेक वेळा आकडेवारी वाढवली जाते, खाडाखोड सुरू आहे. आता आरक्षण मिळालंय. गुलाल उधळलाय. मग आता खोटे रेकॉर्ड करायचे काम का सुरू आहे? जामखेड येथे खोटे दाखले दिले जात आहेत. अनेक ठिकाणी खोटे दाखले करायचे काम सुरू आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

सर्वांना एकत्र राहावं लागेल

सागेसोयरे.. म्हणजे खोटे दाखले द्यायचे काम सुरू आहे. प्रमाणपत्रावर खाडाखोड सुरू आहे, दिशाभूल केली जात आहे. मराठा हे कुणबी झाले तर ओबीसी आरक्षण संपून जाईल. त्यामुळेच सर्वांना एकत्र राहावे लागेल, असं आवाहन त्यांनी केलं.

मागे

याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6,000, यादीत आहे का तुमचे नाव
याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6,000, यादीत आहे का तुमचे नाव

या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये जमा करण्यात येतात. प....

अधिक वाचा

पुढे  

छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा… जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा… जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीन....

Read more