ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शपथविधीला कोणाकोणला आमंत्रण ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 04:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शपथविधीला कोणाकोणला आमंत्रण ?

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. त्य़ामुळे शिवसेनेकडून शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांना यासाठी आमंत्रण पाठवण्यात येणार आहे. ज्यामध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. शिवाज पार्क येथे हा शपथविधी सोहळा होणार असून जवळपास ७० हजार खुर्च्या येथे लावण्यात येत आहेत. तसेच एका मोठ्या मंचावर जवळपास १०० जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

कोणकोणाला निमंत्रण

१. राज ठाकरे, मनसे

, ममता बनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

३. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

४. चंद्रबाबू नायडू, टीडीपी

५. अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

६. अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

एचडी देवेगौडा, माजी पंतप्रधान, जेडीएस अध्यक्ष राहुल गांधी हे येणार की नाही याबाबत शंका आहे. शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार हे स्वतः नावं ठरवणार आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी म्हटलं होतं की, 'शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना देखील आमंत्रण दिलं जाईल.' पण पक्षाकडून त्यांना निमंत्रण दिलं जाईल की नाही याबाबत सांगता येणार नाही.

गुरुवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांनी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्क येथे हा शपथविधी होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी ज्या ठिकाणी मंच उभा केला जातो. त्याच ठिकाणी शपथविधीसाठीचा मंच उभा केला जाणार आहे.

 

 

 

मागे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता

राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतस....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरेंना रोखण्याचा अखेरचा प्रयत्नही फसला
उद्धव ठाकरेंना रोखण्याचा अखेरचा प्रयत्नही फसला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर म्हणजेच दादरच्या शिवाजी....

Read more