ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

किरीट सोमय्यांना मोठा धक्का शिवसेनेचे राऊत लढवणार विरोधात निवडणूक

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 29, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

किरीट सोमय्यांना मोठा धक्का शिवसेनेचे राऊत लढवणार विरोधात निवडणूक

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुक लढवता यावी यासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीवर मनधरणीचे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले किरीट सोमय्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.  मात्र अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही.लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस फार कमी होत आहेत, ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना तर आता मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं असून, जर भाजपने सोमय्यांना तिकीट दिले तर त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनिल राऊत यांनी स्पष्ट केले आहे. वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधात 100 टक्के निवडणूक लढवणार,' असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांना निवडणूक लढवणे अवघड होणार आहे. राऊत यांनी निवडणूक लढवणार असे सांगितले तेव्हा शिवसेने तर्फे मात्र त्यांना कोणताही विरोध दिसून येत नाही त्यामुळे सोमय्या यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका भोवणार आहे.

मागे

विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना विरोधकांनी आखला होता डाव - पंतप्रधान
विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना विरोधकांनी आखला होता डाव - पंतप्रधान

भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या कैदेत असताना ....

अधिक वाचा

पुढे  

"हार्दिक पटेल यांना मोठा धक्का, लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही"

काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे लोक....

Read more