ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेतील 'अर्धनग्न आंदोलन' करणाऱ्या तरुणाला ठेवलं नजरकैदेत...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेतील 'अर्धनग्न आंदोलन' करणाऱ्या तरुणाला ठेवलं नजरकैदेत...

शहर : मुंबई

लोकसभा निवडणूक २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर 'अर्धनग्न आंदोलन' करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याला येवला तालुका पोलिसांनी नजरकैद केलंय.  येवल्याच्या नागरसूल भागातील कृष्णा डोंगरे हा तरुण शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. सध्या त्याचे अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही निवेदन सोपवलं होतं. आज येवल्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कृष्णा डोंगरे यांनी कुठलीही गडबड करू नये, म्हणून काल संध्याकाळपासून स्थानिक पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत, मात्र व्हिडिओ अल्बममध्ये दिसतात. त्यामुळेच आपल्याला त्यांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी ५०० रुपये देण्यासाठी त्यांना भेटायचं होतं. मात्र पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याची खोचक प्रतिक्रिया कृष्णा यानं दिलीय.

मागे

परळच्या बुलेट वर्ल्डची नवी युक्ती मतदान केल्याचा सेल्फी पाठवा आणि मोफत सर्व्हीसिंग मिळवा...
परळच्या बुलेट वर्ल्डची नवी युक्ती मतदान केल्याचा सेल्फी पाठवा आणि मोफत सर्व्हीसिंग मिळवा...

 सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक राजकीय प....

अधिक वाचा

पुढे  

प्रसिद्ध पंजाबी गायक  दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल
प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी भाजपमध्ये दाखल झ....

Read more