ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप आणि काँग्रेसला या राज्यांत एकही जागा नाही

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 24, 2019 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप आणि काँग्रेसला या राज्यांत एकही जागा नाही

शहर : देश

देशात भाजपने एकहाती सत्ता काबीज करताना काँग्रेसची पूरती धुळधाण केली तरीही सहा राज्यांत भाजपला एकही जागा मिळवता आलेली नाही, हे विशेष. तसेच एका राज्यात भाजपला एक टक्का मते मिळालेली नाहीत. भाजपपुढे काँग्रेसचा टिकाव लागलेला नाही. काँग्रेसला १७ राज्यांत चक्क भोपळाही फोडता आलेला नाही. आधीच पराभव आणि १७ राज्यांत एकही जागा न मिळाल्याने काँग्रेसची चिंता अधिक वाढली आहे.

देशात सात टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे जवळपास दोन महिने राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. प्रचारात काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली. प्रचारात एकदम टोकाची भूमिका राजकीय नेत्यांची पाहायला मिळाली. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारताना काँग्रेसला जोरदार दे धक्का दिला. पुन्हा एकदा देशात मोदी राज पाहायला मिळणार आहे. मोदींच्या डंका एवढा असल्याने तब्बल १७ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.

दरम्यान, देशात एकहाती सत्ता मिळवूनही भाजपची दक्षिणेत कर्नाटक वगळताम मोठी धुळधाण उडाली. भाजपलाही सहा राज्यांमध्ये भोपळा वाट्याला आला. यात आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, मेघालय, मिझोराम, सिक्कीम या राज्यांत भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही. तसेच आंध्रमध्ये भाजपला एक टक्काही मते मिळालेली नाहीत.

काँग्रेसला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दिव आणि लक्षद्वीप या ठिकाणी खातेही खोलता आलेले नाही. 

 

मागे

सद्य केंद्रीय मंत्रिमंडळाची आज अखेरची बैठक, उद्या सत्तास्थापनेचा दावा
सद्य केंद्रीय मंत्रिमंडळाची आज अखेरची बैठक, उद्या सत्तास्थापनेचा दावा

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालात प्रचंड बहुमताने विजयानंतर आज पंतप्रधान न....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणूक निकाल २०१९: संसदेत या महिला करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व
लोकसभा निवडणूक निकाल २०१९: संसदेत या महिला करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ मध्ये भाजपनं बाजी मारलेली दिसतेय. भाजप आणि मित्र....

Read more