ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिनेत्री जया प्रदा यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 26, 2019 04:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिनेत्री जया प्रदा यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

शहर : मुंबई

अभिनेत्री जया प्रदा यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्या रामपूरहुन आजम खान यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांना काम करायची इच्छा आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो असे भाजपातर्फे सांगण्यात आले. तर हा माझ्या जीवनातील अमूल्य क्षण आहे. कला असो किंवा राजकारण मी सर्वस्व पणाने काम केले. आज भारतीय जनता पार्टीत सन्मानाने मला सदसत्व दिले त्याबद्दल त्यांचे आभार. आज पहिल्यांदाच राष्ट्रीय पार्टीने बहादुर नेता, ज्यांच्या हातात देश सुरक्षित आहे अशा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे सौभाग्य मिळाले आहे असे यावेळी जया प्रदा म्हणाल्या.

जया प्रदा यांनी 1994 मध्ये तेलगू देशम पार्टीतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. तेलगू देशम पार्टीचे संस्थापत एनटी रामाराव यांनी त्यांना पार्टीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्याशी मतभेद झाल्यानंतर जया प्रदा यांनी तेलगू देशम पार्टीची साथ सोडली होती. आता त्या भाजपात प्रवेश करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिनेत्री जया प्रदा देखील आता भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्यानुसार आता जया यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला आहे. जया या समाजवादी पार्टीच्या माजी सदस्या आहेत. 2010 मध्ये त्यांना समाजवादी पार्टीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पार्टीच्या विरूद्ध कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.त्यानंतर त्यांनी अमर सिंह यांच्याशी हात मिळवणी केली आणि राष्ट्रीय लोकमंच पार्टीच्या बॅनर अंतर्त 2012 मध्ये लोकसभा निवडणूक देखील लढली. पण त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. जया प्रदा या अमर सिंह यांना आपले गॉडफादर मानतात. अमर सिंह हे सध्या भाजपाशी जवळीक साधताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मै भी चौकीदार' या अभियानात अमर सिंह यांनी देखील रस दाखवला. अमर सिंह यांनी आपल्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला.

 

मागे

श्रीनिवास वानगा यांना डच्चू! राजेंद्र गावित यांनी अखेर शिवबंधन बांधले
श्रीनिवास वानगा यांना डच्चू! राजेंद्र गावित यांनी अखेर शिवबंधन बांधले

मुंबई : पालघरमध्ये शिवसेनेकडून श्रीनिवास वानगा यांना डच्चू दिला असून भाज....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान मोदी काही वेळेतच देशाला करणार संबोधित
पंतप्रधान मोदी काही वेळेतच देशाला करणार संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळेतच देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानां....

Read more