ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपच्या विजयासाठी महादेव जानकर लागले कामाला; बारामती, सांगली, माढात करणार प्रचारला सुरुवात

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपच्या विजयासाठी महादेव जानकर लागले कामाला; बारामती, सांगली, माढात करणार प्रचारला सुरुवात

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने एकही जागा न दिल्यामुळे नाराज असलेल्या महादेव जानकर यांनी आता आपला रूसवा काढून टाकला आहे. भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आता ते जोरदार कामाला लागले आहेत. बारामती, माढा व सांगली या तीन मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते मेहनत घेत आहेत.
बारामती व माढापैकी कोणतीही एक जागा जानकर यांना मिळू शकेल अशी चर्चा होती. जानकर यांच्या रासपने माढा, बारामती व परभणी या तीन मतदारसंघांची महायुतीकडे मागणी केली होती. पण महायुतीने जानकरांना एकही जागा देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे जानकर कमालीचे नाराज झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांची नाराजी दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जानकर कुठेशे नरमले आहेत.

बारामतीमध्ये कांचन कूल रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे यांच्यापुढे त्यांचा कितपत निभाव लागेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पण सुळे यांना मागील निवडणुकीत जानकर यांनी जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे जानकरांनी प्रचारात उतरावे यासाठी भाजपने प्रयत्न केले. त्यानुसार स्वतः जानकर कूल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यांच्यासाठी आता स्वतंत्र सभाही घेणार आहेत. रासपच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कूल यांचे काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मागे

मोदींवर माझे प्रेम आहे, पण ते माझा द्वेष करतात – राहुल गांधी
मोदींवर माझे प्रेम आहे, पण ते माझा द्वेष करतात – राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी प्रेम करतोच, त्यांचा द्वेष करीत नाही. परंतू ते ....

अधिक वाचा

पुढे  

पुणेकरांच्या वामकुशीमुळे 'दुपारी १ ते ४ प्रचार सभा रद्द
पुणेकरांच्या वामकुशीमुळे 'दुपारी १ ते ४ प्रचार सभा रद्द

'ऐकतील ते पुणेकर कसले... जगात काहीही होवो...पुणेकर त्यांच्या सवयी सोडणार नाह....

Read more