ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रकाश मेहता आणि विद्या ठाकुरांना मंत्रिमंडळातून डच्चू?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रकाश मेहता आणि विद्या ठाकुरांना मंत्रिमंडळातून डच्चू?

शहर : मुंबई

एम. पी. मिल कंपाऊंड एफएसआय घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरवलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा केली होती. 

यानंतर आज सकाळपासून मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याविषयी बरेच तर्कवितर्क लढवले जात आहे. 'झी २४ तास'ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिवसेनेच्या पाच आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाईल. मात्र, यासाठी पाच विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचे सांगितले जाते. यामध्ये प्रकाश मेहता, प्रवीण पोटे, विद्या ठाकूर, गडचिरोलीचे पालकमंत्री अंब्रीश आत्राम यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. हे सर्व मंत्री आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे देतील, असे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपाचे आमदार अतुल सावे तसंच मोर्शीचे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. याशिवाय, रिपाईच्या अविनाश महातेकर यांनाही मंत्रीपद मिळेल.

उद्या सकाळी ११ वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार उरकण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

 

मागे

तिन्ही निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे
तिन्ही निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे

या वर्षाच्या शेवटापर्यंत तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. या तिन....

अधिक वाचा

पुढे  

मंत्रिमंडळ विस्तार : रिपाईला एक जागा... पाहा या नेत्यांना मिळू शकते संधी
मंत्रिमंडळ विस्तार : रिपाईला एक जागा... पाहा या नेत्यांना मिळू शकते संधी

राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. मात्र याआधीच मंत्र....

Read more