ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गेल्या अठरा दिवसात भाजपा, शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसला काय मिळालं ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2019 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

गेल्या अठरा दिवसात भाजपा, शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसला काय मिळालं ?

शहर : मुंबई

थरारक राजकीय घडामोडींनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कोण कोणासोबत जाणार ? कोणाचा काडीमोड होणार ? या सर्व गोष्टी वेगाने बदलत राहील्या. यानंतर कोणाला काहीच मिळाले नाही, कोणच्या तोंडचा घास गेला तर कोणाला अपेक्षा नसतानाही यश मिळाले. इतक्या घडामोडींनंतर या पक्षांना काय मिळालं याचा हा लेखाजोखा...

शिवसेना - : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रदर्शन समाधानकारक होते. पण पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप, अडीच वर्षे मुख्यमंत्री पद यावर अडून राहील्याने युती तुटली. शिवसेना राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाण्याच्या हालचाली करु लागली. यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला हानी पोहोचली. भाजपाच्या पाठिंब्यावर असलेल्या महानगरपालिकेतील सत्ता जाण्याचा धोका पत्करावा लागू शकतो. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. पण संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना चुकीचा सल्ला देत आहेत असे मानणारा एक गट ही शिवसेनेत आहे.

काँग्रेस -: मागच्या १८ दिवसात काँग्रेस पक्षाला काही नुकसान पोहोचले नाही. कारण हरण्यासारखा डाव त्यांनी खेळला नव्हता. त्यांनी निवडणुकीच्या आधीच हार मानली होती. पुढचे पाच वर्षे विरोधात बसण्याच्या तयारीतच काँग्रेसने निवडणूक लढली होती. पण अर्धी शक्ती लावूनही काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि ते चौथ्या नंबरावर पोहोचले. त्यामुळे शेवटच्या बॅट्समन मैदानात येतो आणि ८० धावा करतो त्याला शतक केल्याचे दु: नसते. अशी स्थिती सध्या काँग्रेसची आहे.

भाजपा -: आनंद, दु; आणि पुन्हा आनंद असा काहीसा अनुभव सध्या भाजपा घेत आहे. विधानसभा निवडणुकीत जनमत भाजपाच्या बाजुने आले पण एकहाती सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांना शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाचे वाटप करायचे नव्हते त्यामुळे शिवसेनेने त्यांच्यासाठी चर्चेची दारे बंद केली. आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस देखील सत्तास्थापने पर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या गोटात पुन्हा आनंद आहे. त्यामुळे कोणत्या एका पक्षाचा जनाधार वाढणार असेत तर तो भाजपा असेल असे राजकीय अभ्यासक सांगतात. पण समाधानकारक निकाल देऊ शकल्याने पक्षांतर्गत फडणवीस यांचे महत्व थोडे कमी झाले आहे. पण दैव आणि मोदी-शहा ही जोडी त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत त्यांना काळजी करण्याचे कारण नाही.

 

मागे

१४५च्या संख्याबळाने सरकार भाजपच स्थापन करणार - नारायण राणे
१४५च्या संख्याबळाने सरकार भाजपच स्थापन करणार - नारायण राणे

महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवट लागू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेगळं वळ....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात चर्चा
उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात चर्चा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. तरीही आगामी काळात भाजपाला सत्तेपासून दू....

Read more