ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नवा फॉर्म्युला?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नवा फॉर्म्युला?

शहर : देश

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाला सात दिवस उलटले तरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं विनोदी नाट्य सुरूच आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर राहुल गांधी ठाम आहेत. याचा अर्थ ते कोणाचंही ऐकणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय. पण पुढचा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत ते ही जबाबदारी सांभाळण्यास तयार आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. राहुल गांधी ठाम राहिल्यामुळे आता अध्यक्षपदाच्या नव्या फॉर्म्युलाचा विचार पक्षात सुरू आहे.

एक अध्यक्ष आणि चार कार्यकारी अध्यक्ष असा नवा फॉर्म्युला पुढे येण्याची शक्यता आहे. चार कार्यकारी अध्यक्ष देशभरात फिरून पक्षाच्या प्रचार-प्रसाराचं काम पाहतील. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहनसिंग यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय सध्या कॅप्टन अमरिंदरसिंग, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, शशी थरूर, . के. अँटनी यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात आणि राहुल गांधींना अमेठी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे काँग्रेस पक्षात निराशेचं वातावरण आहे. अनेक छोटे-मोठे नेते पक्षाला राम-राम ठोकण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय पक्क केलाय. सहकारी पक्ष द्रमुख आणि पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आपला राजीनामा परत घेण्याचा आग्रह केला. परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत.  

मागे

'महिनाभरात मला पर्याय शोधा', राहुल गांधी राजीनाम्यावर अडून
'महिनाभरात मला पर्याय शोधा', राहुल गांधी राजीनाम्यावर अडून

लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्यानंतर पार्टी अध्यक्ष....

अधिक वाचा

पुढे  

“माझ्या मुलासारखंच तूही काम कर”, धैर्यशील मानेंना  राजू शेट्टींच्या आईचा आशीर्वाद
“माझ्या मुलासारखंच तूही काम कर”, धैर्यशील मानेंना राजू शेट्टींच्या आईचा आशीर्वाद

कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नवनिर्वाचित खा....

Read more