ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2020 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला

शहर : मुंबई

कल्याण शीळ रोडवरील रस्त्यावरचे खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे  तीन तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या ठिकाणी आतापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो,” असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाण्यात रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. काल (24 ऑगस्ट) उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकींसाठी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काही रस्ते चकाचक करण्यात आले. मुख्यमंत्री ज्या ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत, त्या सर्व रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात आले.विशेष म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उभं राहून रस्त्यावर राहून खड्डे बुजवून घेतले. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरुन प्रवास करणार आहेत केवळ त्याच रस्त्यावरील खड्डे बुजवले असल्याचे बोललं जात आहे. मात्र इतर रस्त्यांकडे कोणीही अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे इतर रस्त्यांचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित केले जात आहे.

 

मागे

राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध काढून टाका अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्....

अधिक वाचा

पुढे  

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ७ महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ७ महत्त्वाचे निर्णय

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्व....

Read more