ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पराभवानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 07:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पराभवानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया

शहर : मुंबई

दक्षिण मध्य मुंबईचे कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव झाला असून या ठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. यानंतर मिलिंद देवरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या नवनिर्वाचित आणि निवडून आलेल्या खासदारांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी लोकसभेमध्ये परिणामकारक कामगिरी सर्व खासदार करतील अशी मी आशा करतो. राजकीय विरोधक असूनही आमच्या शहरासाठी कायम माझा सहयोग आणि पाठिंबा राहील असे देवरा यांनी म्हटले आहे.

मुंबई काँग्रेसने अतिशय नम्रतेने मुंबईच्या लोकांचा निर्णय स्वीकारला आहे. काँग्रेस पक्षाने पाच मतदारसंघातून अनुभवी आणि प्रसिद्ध उमेदवार उभे केले, ज्यांनी भाजपा आणि शिवसेनेला कडवी झुंज दिल्याचे देवरा म्हणाले. सर्व मतदात्यांना, कामगारांना आणि काँग्रेस पक्षाच्या शुभेच्छुकांचे त्यांनी आभार मानले. काँग्रेस पक्षाची एकता, कामगारांची बांधिलकी आणि मुंबईकरांचा विश्वास यामुळेच रोज ही लढाई अशीच चालू ठेवण्याचं बळ मिळत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही नक्कीच भाजपा आणि शिवसेनेला विरोधक म्हणून चांगलीच टक्कर देऊ असेही ते म्हणाले.

मागे

अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं
अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. या निकालांत भाजपा देशात....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रात दिग्गजांना पराभवाचा धक्का,वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित फसले
महाराष्ट्रात दिग्गजांना पराभवाचा धक्का,वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित फसले

महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीने २०१४ सारखीच कामगिरी करत सर्व निवडणूक पं....

Read more