ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदींनी अनेक योजना आणल्या पण जाहिरातींवरच जास्त खर्च - पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 06, 2019 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदींनी अनेक योजना आणल्या पण जाहिरातींवरच जास्त खर्च  - पवार

शहर : अहमदनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, अशी टीका शरद पवारांनी केली. मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवगाव येथे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवारी संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत पवार यांनी मोदी आणि भाजप सरकारचा चांगलाच समचार घेतला.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या उपस्थित करण्यात आला. या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यासभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केल. मोदी माझं बोट धरून राजकारण करत असल्याचं सांगतात मात्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, असे सांगत मोदी सरकारने अनेक योजना आणल्या. मात्र योजनांचा पैसा जाहिरातीवर खर्च केला, असा टोला पवार यांनी मोदींना लगावला.

पुलवामा येथे घडलेल्या हल्ल्यानंतर भारत सारकारने चोख उत्तर दिले इतकेच नाही तर पाकिस्तान मधून अभिनंदन याची सुटका देखील केली. मात्र 56 इंचाची छाती फुगवून अभिनंदनच्या सुटकेचा श्रेय मोदी घेतात तर मग कुलभूषण जाधव यांना का सोडू शकले नाहीत, असा सवाल करत यावर मात्र मोदी बोलत नसल्याचं देखील पवार यांनी

मागे

विरोधकांकडे अडवाणींसारखा भीष्माचार्य नाही, विष्णुरुपी मोदीही नाहीत- शिवसेना
विरोधकांकडे अडवाणींसारखा भीष्माचार्य नाही, विष्णुरुपी मोदीही नाहीत- शिवसेना

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपले मौन सोडणे ही खूपच आनंदाची ब....

अधिक वाचा

पुढे  

भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा
भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा

भारतीय जनता पार्टीला आज 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरें....

Read more