ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

३० हजार बेरोजगार तरुण लष्करातल्या ६३ जागांसाठी नाशिकमध्ये

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 10:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

३० हजार बेरोजगार तरुण लष्करातल्या ६३ जागांसाठी नाशिकमध्ये

शहर : मुंबई

नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटर इथल्या मैदानावर लष्कर भरती सुरू आहे. टीए पॅराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी जवळपास ३० हजारांहून अधिक तरुण दाखल झालेत. राज्यातूनच नव्हे तर आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह देशभरातून हजारो बेरोजगार तरुण नाशिकमध्ये दाखल झालेत. सोल्जर जनरल ड्युटी, हेअर ड्रेसर, हाऊस कीपिंग अशा वेगवेगळ्या ट्रेडमनच्या ६३ जागांवर भरती होतेय. आजपासून सहा दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे.

बुधवारी पहाटे चार वाजता या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. मात्र गर्दी बघून मध्यरात्रीपासून भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीय. लष्करी अधिकारी, पोलिसांच्या उपस्थितीत ही भरती प्रक्रिया सुरु आहे.

अनेकांनी काही तास आधीच हजेरी लावल्याने बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर आणि रस्त्याच्या कडेलाच उघड्यावरच आपला मुक्काम केलाय. यापूर्वी देखील हाडं गोठवणाऱ्या थंडीत भरती प्रक्रिया पार पडलीय. शिवाय चेंगराचेंगरी देखील झाली होती. त्यात तरुण गंभीर जखमी झाले होते.

मागे

शिवसेनेच्या ५६ पैंकी ४५ आमदार भाजपात येण्यासाठी इच्छूक
शिवसेनेच्या ५६ पैंकी ४५ आमदार भाजपात येण्यासाठी इच्छूक

शिवसेना आणि भाजपामधला सत्तासंघर्ष दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होताना दिसत आ....

अधिक वाचा

पुढे  

काश्मीरात युरोपियन पथक गरज आहे काय? शिवसेनेचा 'सामना'तून सवाल
काश्मीरात युरोपियन पथक गरज आहे काय? शिवसेनेचा 'सामना'तून सवाल

युरोपियन संघ (ईयू) चं संसदीय प्रतिनिधीमंडळाने २९ ऑक्टोबर रोजी काश्मीर दौरा ....

Read more