ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 26, 2019 10:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध

शहर : मुंबई

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई कमी करणे हा जाहीरनाम्यामागाचा उद्देश असल्याचे जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून या जाहीरनाम्यात महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आले आहेत. हमारा, आपका, हम सबका भारतअशी या जाहीरनाम्याची संकल्पना आहे. तसेच भारत हा सर्वांचा देश असून ही संकल्पना या जाहीरनाम्यातून समोर ठेवली आहे. त्याचप्रमाणे शेती आणि शेतकर्‍यांची हलाकीची परिस्थिती असून शेतकरी, युवा आणि महिला या वर्गाला समोर ठेवून जाहीरनामा बनवला असल्याचे देखील वळसे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

या जाहीरनाम्यात शेती, आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर (एमएसएमई) भर, कामगार कायद्यांत सुधारणा, कर सुधारणा, भांडवली आणि वित्तीय बाजारपेठा, मानव संसाधन विकास, डिजिटल भारत, आरोग्याचा हक्क, महिला आणि बाल कल्याण, बालसुरक्षा आणि महिला सक्षमीकरण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरिक, संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, व्यापारी धोरणे, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, समाजिक न्याय, अल्पसंख्याक, लोकशाही संस्थांची चौकट बळकट, सार्वजनिक खाजगी भागीदारीला नवसंजीवनी, मनरेगा आणि उत्पानातील असमानता आदी विषय या जाहीरनाम्यात घेण्यात आले आहेत.

 

मागे

महाराष्ट्रात मतदानासाठी 3 लाख शाईच्या बाटल्या, कुठं बनते ही शाई
महाराष्ट्रात मतदानासाठी 3 लाख शाईच्या बाटल्या, कुठं बनते ही शाई

मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई ल....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना भाजपाकडून ऑफर
काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना भाजपाकडून ऑफर

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी एक गौप्यस्फोट केल....

Read more