ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसणार'; प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 26, 2019 03:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसणार'; प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण

शहर : मुंबई

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार आहे. तसंच राष्ट्रवादी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. सरकार स्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल. भाजप-शिवसेनेला कौल मिळाला आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला मदत करणार का? असे प्रश्न निकाल लागल्यानंतर विचारण्यात येत होते, पण प्रफुल्ल पटेल यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काही वक्तव्य केली होती, त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला होता. पण प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

शिवसेनेने आमच्याशी अजून संपर्क साधला नाही, पण त्यांनी समर्थन मागितलं तर आम्ही पक्षश्रेष्ठींची बोलून निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रीपद हवं का उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेने ठरवावं, असं वक्तव्य केलं होतं.

 

मागे

शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक...
शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक...

नुकत्याच झालेल्या विधानसभी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रम....

अधिक वाचा

पुढे  

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर अपयशी का? शरद पवारांचं अचूक विश्लेषण
राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर अपयशी का? शरद पवारांचं अचूक विश्लेषण

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादीनं तिसऱ....

Read more