ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

“अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ”, राष्ट्रवादीची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 07:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

“अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ”, राष्ट्रवादीची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

शहर : मुंबई

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. 'अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ' अशी जहरी टीका राष्ट्रवादीने केली आहे. त्याचवेळी ५ वर्ष अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत. हेच का शिवरायांचे मावळे?? यांनी शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अफझल खानाच्या फौजेत जाऊन सेनेच्या सेनापतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगर गाठले, असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केलीआहे.

पाच वर्ष एकमेकांना 'पटकणारे', कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझल खानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असे अजित पवार यांनी ट्विट करताना म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गांधीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरला. अमित शाहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीए घटकपक्षांचे नेतेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे अहमदाबादमध्ये दाखल झालेत आणि अमित शाहांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यावरुन राष्ट्रवादीने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी अजित पवार यांनीही बोचरी टीका केली.