ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंदीचा अभ्यास केल्यास कळेल की मंदी जगभरात आहे. -निर्मला सीतारमन

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 08:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंदीचा अभ्यास केल्यास कळेल की मंदी जगभरात आहे. -निर्मला सीतारमन

शहर : delhi

आपल्या देशात नेहमीच मंदी असल्याच चित्र रंगवल जात मात्र मंदी भारतातच नव्हे तर जगभरात आहे,हे लक्षात येईल असे निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

जगभरात असलेल्या मंदीच्या तुलनेत भारत सक्षम आहे. आपली अर्थव्यवस्था बळकट आहे. आपल्या कडे व्यवहार करण सोपे आहे. तसेच कर रचना ही अजून सुलभ केली जात आहे. अस व्यक्तव्य अर्थमंत्र्यांनी केले आहे. कॅपिटल गेन्सवरचा सरचार्ज मागे घेण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

गिरी तो भी टांग उपर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. त्याचाच प्रत्यंतर आज निर्मला सीतारमण यांनी दिले आहे. असे म्हणावे लागत आहे. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याच म्हणत आहे. यावरून भारतातली मंदी वास्तवातली आहे की स्वप्नवत असा प्रश्न पडू लागला आहे. गेल्या हफ्त्याभराचीच माहिती आपण घेतल्यास पार्लेजी कंपनीची कमी होणारी विक्री आणि नोकर कपात , ऑटो मोबाइल मध्ये होणारी विक्री ची घसरण आणि बंद पडत चाललेले शो रूम, महिंद्र कंपनीने बंद केलेले कारचे उत्पादन, डिजिटल मार्केटिंग , अनेक विविध आर्थिक योजना, नोटबंदी , बँकांसाठीची नवनवे उभारणीचे धोरणेही अपयशी होत आहेत. ही काही उदाहरण घेतलेली तरी लक्षात येईल की भारतीय बाजारात किती मंदी आहे . मात्र जगाच्या जीडीपी दराचा हवाला देवून देशातील मंदी काहीच नाही अस मत मांडून भारत अजूनही सक्षम आहे अस सांगून काय दाखवून द्यायचं आहे हे अर्थ मंत्र्यांनाच माहीत. भारतीय बाजारात आलेली मंदी मान्य करायचीच नाही आपल अपयश जगाला दाखवायचच नाही असाच काहीसं चित्र उभारल जात आहे.   

मागे

आता मनसेची ईडीला नोटिस, फलक मराठीत लावा
आता मनसेची ईडीला नोटिस, फलक मराठीत लावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमलबजावणी संचालयाने नोटिस बजावून त्यांची काळ ....

अधिक वाचा

पुढे  

माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांचं निधन
माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांचं निधन

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज वयाच्या 66 वर्षी दिल्लीत दीर्घ आजाराने न....

Read more