ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’, नितीशकुमार मंत्रिमंडळात दोघांना लॉटरी; काय आहे समीकरण?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 28, 2024 02:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’, नितीशकुमार मंत्रिमंडळात दोघांना लॉटरी; काय आहे समीकरण?

शहर : amarpur

नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बिहारमधील आरजेडीसोबतची त्यांची आघाडी तुटली आहे. नितीशकुमार आता भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहेत. तशी त्यांची भाजपसोबत चर्चा झाली आहे. आज संध्याकाळीच राज्यात नवं सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये नवीन समीकरणे पाहायला मिळणार आहेत. तर नितीशकुमार यांच्या या खेळीमुळे इंडिया आघाडीचेही शकले झाली आहेत.

नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील राजकारण ढवळून निघालं आहे. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी केली असून बिहारमध्ये पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणे उदयास आली आहेत. नितीशकुमार आजच नवं सरकार स्थापन करणार आहेत. यावेळी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू होणार आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्याच पद्धतीने बिहारमध्येही दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा नितीशकुमार मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होणार आहेत. आजच नितीश कुमार यांचा शपथविधी होण्याचीही शक्यता आहे. नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांना फोन केला. या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

संध्याकाळी शपथविधी

नितीशकुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यांचा शपथविधी आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज दुपारी 4.45 वाजता पाटण्याला येणार आहेत. नड्डा हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीपूर्वी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीलाही नड्डा उपस्थित राहणार आहेत.

सम्राट चौधरी विधीमंडळ नेते

बिहारचे भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच विजय सिंह यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय गेण्यात आला आहे. यावेळी सम्राट चौधरी यांनी सर्व आमदारांचे आबार मानले असून आभाराचा प्रस्तावही नितीशकुमार यांच्याकडे पाठवला आहे. 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकीत 40 पैकी 40 जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.

काय म्हणाले नितीशकुमार?

राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमार यांनी मीडियाशी संवाद साधला. तसेच राजीनामा देण्यामागचं कारणही स्पष्ट केलं. माझ्या पक्षातील नेत्यांच्या आग्रहानंतर मी राजीनामा दिला आहे. सरकारच्या सर्व कामाचं काम आरजेडी घेत होती. मी काम करत होतो. पण मला काम करू दिलं जात नव्हतं. दोन्ही बाजूने त्रास होत होता. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय, असं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.

मागे

मनोज जरांगेची औकात नाही, लायकी नाही…जरांगे यांना आता कोणाकडून आव्हान
मनोज जरांगेची औकात नाही, लायकी नाही…जरांगे यांना आता कोणाकडून आव्हान

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला. यानं....

अधिक वाचा

पुढे  

ओबीसी नेते कोर्टात गेले तर मंडल आयोगालाच चॅलेंज करेल, मनोज जरांगे यांचा प्रतिहल्ला
ओबीसी नेते कोर्टात गेले तर मंडल आयोगालाच चॅलेंज करेल, मनोज जरांगे यांचा प्रतिहल्ला

राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे. या जीआरला न्यायालय....

Read more