ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक - आदेश बांदेकर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 12:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक - आदेश बांदेकर

शहर : मुंबई

केंद्रानेसुद्धा महाराष्ट्राने पाठवलेल्या फाईल्स या तातडीने मंजूर करुन पाठवल्या पाहिजेत. त्यासाठी केंद्राचा सुद्धा हातभार या ठिकाणी लागणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी फक्त मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा जरी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी वळवला, तरी बऱ्याच प्रश्न मार्गी लागतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी दिली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. पण त्यासोबतच केंद्राचीही जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्रानेसुद्धा महाराष्ट्राने पाठवलेल्या फाईल्स तातडीने मंजूर करुन पाठवल्या पाहिजेत. त्यासाठी केंद्राचा हातभार या ठिकाणी लागणे आवश्यक आहे.” असेही आदेश बांदेकर म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही सूडबुद्धीने वागणार नाही, कारण ती वृत्ती नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारं आपलं स्वतंच वाटणारे, प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक शेतकऱ्याला, सामान्य नागरिकाला हे सरकार माझं आहे असं प्रत्येकाला वाटेल,” असा विश्वासही आदेश बांदेकरांनी व्यक्त केला.तसेच फक्त मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा जरी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी वळवला तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.” असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने माझ्या मनात खूप आनंद आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जी इच्छा होती ती इच्छा उद्या शिवतीर्थावर पूर्ण होणार आहे.” असेही बांदेकर म्हणाले.

उद्या शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे. ही प्रत्ये शिवसैनिकासाठी आनंद देणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक माणूस हा आनंदी व्हावा हे पहिल्यापासून शिवसेनेचे धोरण आहे.” असेही ते म्हणाले.

अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांवरचे प्रत्येक संकट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीवर विश्वासादर्शक हात असू द्या. हे सर्व उद्धव ठाकरे समजून घेत होते. प्रत्येक वेळा शेतकऱ्यांनी ज्या वेदना मांडल्या होत्या त्यांना न्याय मिळावा. तो न्याय आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या माध्यामातून मिळतो आहे. शेतकऱ्यांची कामे पूर्ण होतील हा विश्वास त्यांना वाटू लागला आहे.” असेही आदेश बांदेकर म्हणाले.

ठाकरेंचा ग्रँड शपथविधी

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या चार दिवसात कोसळल्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार निश्चित झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) शपथ घेणार आहेत.

मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.

शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारलं जात आहे. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.

मागे

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला विरोध
विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला विरोध

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ....

अधिक वाचा

पुढे  

अजित पवार ऐन शपथविधीच्या दिवशी 'नॉट रिचेबल'
अजित पवार ऐन शपथविधीच्या दिवशी 'नॉट रिचेबल'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे....

Read more