ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तरच राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार करू- पृथ्वीराज चव्हाण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...तरच राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार करू- पृथ्वीराज चव्हाण

शहर : मुंबई

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालापूर्वीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मतं व्यक्त केलीत. विशेष म्हणजे राज ठाकरेंबद्दलच्या विचारलेल्या प्रश्नावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक विधान केलं आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाऊन स्वतःची प्रतिमा सुधारली होती. मोदींच्या हुकूमशाहीला राज ठाकरेंनी केलेला विरोध सर्वांनीच पाहिला आहे. कोणत्याही पक्षाबरोबर  विचारांची बेरीज होणं गरजेचं असतं. सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आवश्यक असतं. 23ला कशा प्रकारे निकाल लागतील हे पाहू, नंतर ठरवू राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

ते म्हणाले, मोदींची पत्रकार परिषद होती की निरोप समारंभ होता हेच शेवटपर्यंत कळलं नाही. 5 वर्षांनंतरही मोदी पत्रकारांना सामोरे जात नाहीत. ईव्हीएमवर शंका असल्यानं व्हीव्हीपॅट मशिन वापरले. परंतु ईव्हीएमवर आमचा विश्वासच नाही. एक्झिट पोल करण्यासाठी भाजपानं किती पैसे दिले ते सांगावे. एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांवर नियंत्रण आणावे. देशाच्या लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकारनं कर्जमाफीचं फक्त गाजर दाखवलं. 2014पेक्षा काँग्रेसच्या जागा यंदा जास्त प्रमाणात वाढतील.

जीएसटी, नोटाबंदीसारखे निर्णय मोदींनी हट्टीपणानं घेतल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. शपथविधीची तयारी सरकारनं केली आहे. जो जिंकेल त्याला ती उपयोगी पडले, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर ते म्हणाले, आंबेडकरांच्या बाबतीतली भाजपानं ठरवलेली रणनीती यशस्वी झाली. वंचित आघाडीमुळे मतांचं धुव्रीकरण होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

 

मागे

भाजपा स्वबळावर केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी अपयशी ठरेल,एनडीएला 261 तर यूपीएला 167 जागांचा अंदाज
भाजपा स्वबळावर केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी अपयशी ठरेल,एनडीएला 261 तर यूपीएला 167 जागांचा अंदाज

देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाला घेऊन विविध तर्कवितर्कांना उधाण आलेल....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे
काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे

लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तसंस्थांनी आपापली एक....

Read more