ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनिल अंबानींच्या घराबाहेर चौकीदारांची रांग, नरेंद्र मोदींचा प्रथम क्रमांक - राहुल गांधी टीका

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 07:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनिल अंबानींच्या घराबाहेर चौकीदारांची रांग, नरेंद्र मोदींचा प्रथम क्रमांक - राहुल गांधी टीका

शहर : delhi

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून चौकीदारांची रांग लागली असून नरेंद्र मोदी पहिले उभे आहेत असा टोला लगावला आहे. जयपूरमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली. चौकीदाराने चोरी केली असून भारताच्या हवाई दलाकडून 30 हजार कोटींची चोरी केली आणि अनिल अंबानी यांना दिले असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
‘तुम्ही कधी एखादा शेतकरी, कामगार किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिलंय का ? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत ? तिथे चौकीदारांची रांग लागली असून मोदीजी त्या रांगेत सर्वात पहिले आहेत’, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
राहुल गांधी बोलत असताना चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर राहुल गांधी काय चोरी झाली माहिती आहे का ? अशी विचारणा करत सांगितलं की, ‘चौकीदाराने चोरी केली असून भारताच्या हवाई दलाकडून 30 हजार कोटींची चोरी केली आणि अनिल अंबानी यांना दिले. 15 लोकांचं पाच लाख 55 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. भारतातील शेतकरी, दुकानदार, तरुण यांचं एक रुपयाचं कर्ज माफ केलं नाही पण 15 लोकांचं कर्ज माफ केलं’.
शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि योग्य भाव देणार असं आश्वासन दिलं होतं. तुमच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असं आश्वासन दिलं होतं अशी आठवण करुन देत हीदेखील चोरीच असल्याची टीका राहुल गांधींनी केली. मी खोटी आश्वासनं देणार नाही पण न्याय योजनेमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असा टोलाही त्यांनी लगावला.

मागे

एच.डी.देवेगौडा पंतप्रधान व्हावेत; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत
एच.डी.देवेगौडा पंतप्रधान व्हावेत; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.दे....

अधिक वाचा

पुढे  

‘ये लावरे तो व्हिडीओ’ ला; खर्च सादर करण्याचे आदेश
‘ये लावरे तो व्हिडीओ’ ला; खर्च सादर करण्याचे आदेश

यंदाचा लोकसभा निवडणूकीचा चर्चेत आली ती मनसे प्रमुख राज ठाकरेंमुळे, ये लावर....

Read more